[Marathi] थंडीच्या कडाक्या पासून पुणेकरांची काही काळ सुटका 

January 11, 2019 6:50 PM | Skymet Weather Team

मागील पंधरा दिवसांपासून पुण्यात बोचऱ्या थंडीचा अनुभव  येत होता. 28 डिसेंबरपासून  ते 11 जानेवारी  २०१९ पर्येन्त किमान तापमान  १० अंशा पेक्षा कमी  नोंदले  गेले, फक्त 6 डिसेंबरला किमान तापमान 10 अंशापर्येन्त पोहोचले होते. याउलट कमाल तापमानात विशेष घट दिसून आली नाही.

28 डिसेंबरला किमान तापमान 7.4 अंशाचा आसपास नोंदवले गेले होते, 29 डिसेंबर किमान तापमान 5.9 अंशापर्येन्त पोहोचले॰ 31 डिसेंबरला किंचित वाढ दिसून आली आणि किमान तापमान  6.9 अंश रिकॉर्ड झाले। 1 जानेवारीपासून किमान तापमानात एका नंतर एक वाढ दिसून आली, 2 जानेवारीला किमान तापमान 7.9 अंशाच्या आसपास पोहोचले तर 5 जनेवरीला 9.1 अंश रिकॉर्ड केले गेले।

मागील 24 तासात किमान तापमान 9.7 अंशापर्येन्त पोहोचले आहे॰ पुणेतील किमान तापमानावर नजर टाकूया-

दरम्यान, मागील पंधरा दिवसा  पर्येन्त पुण्यात  थंड वारे उत्तर दिशेने चालू होते ज्यामुळे किमान तापमान सामान्य पेक्षा  १  ते  २ अंशानी कमी होते , परंतु गेल्या 48 तासांपासून वाऱ्याने आपली दिशा बदलली आहे, आणि आता दक्षिण-पूर्वी वारे सुरू झाले आहे, ज्यामुळे किमान तापमानात वाढ सुरू झाली आहे.

येत्या  दोन दिवसात किमान तापमानामध्ये  आणखी वाढ होण्याची  शक्यता  आहे . तसेच कमाल तापमान  30 अंशाच्या  आसपास नोंदवले जाईल. यामुळे  पुणेकरांची थंडीच्या कडाक्या  पासून  काही काळ सुटका  मिळेल.

Image Credits – Wikipedia

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES