मंत्रोच्चारात व इतर धार्मिक विधींच्या साथीने गंगोत्री व यमुनोत्री मंदिराचे प्रवेशद्वार मंगळवारी यात्रेकरूंसाठी खुले करण्यात आले. हिंदूंच्या चार प्रमुख तीर्थक्षेत्रांची म्हणजेच 'चारधाम' यात्रेला सुरुवात झाली.
केदारनाथ आणि बद्रीनाथ या दोन अन्य हिंदू मंदिरांचे प्रवेशद्वार अनुक्रमे बुधवारी आणि गुरुवारी यात्रेकरूंसाठी खुले करण्यात येतील. केदारनाथ मंदिराच्या परिसरात अद्यापही हिमवर्षाव सुरु असून, मंदिराकडे जाणारा मार्ग स्वच्छ केला गेला आहे.
उत्तराखंडमधील यमुनोत्री, गंगोत्री, केदारनाथ आणि बद्रीनाथ या चार तीर्थक्षेत्रांना एकत्रितपणे चारधाम म्हणून ओळखले जाते. चारधाम यात्रा जगातील यात्रेकरूंच्या सर्वात मोठ्या यात्रेपैकी एक आहे आणि दरवर्षी लाखो भक्तांना आकर्षित करते.
परंपरेनुसार, ही यात्रा पश्चिमेपासून सुरू होऊन पूर्वेकडे संपली पाहिजे. अशाप्रकारे, चारधाम यात्रेचे सुरुवात यमुनोत्री पासून होते, त्यानंतर पुढचा टप्पा गंगोत्री आणि शेवटी केदारनाथ व बद्रीनाथ करून यात्रा संपन्न होते. हिंदू परंपरेनुसार दरवर्षी शेकडो भाविक ही धार्मिक यात्रा परमानंद व आत्मप्रक्षालनासाठी करतात.
चारही तीर्थक्षेत्रे प्रत्येकी एका देवतेला समर्पित आहेत. यमुनोत्री 'यमुना' देवीला, गंगोत्री 'गंगा' देवीला, केदारनाथ भगवान शिव आणि बद्रीनाथ भगवान विष्णु यांना समर्पित आहे.
इंग्रेजीत वाचा: The divine doors of Chardham in Uttarakhand open for pilgrims, severe weather ahead
स्थानिक लोकांचा चरितार्थ यात्रेवर अवलंबून असतो म्हणून असे म्हणणे वावगे होणार नाही कि चारधाम यात्रा गढवाल हिमालयाच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. म्हणूनच, शासनाने भाविकांचा प्रवास सुलभ आणि त्रास-मुक्त करण्यासाठी अनेक उपाययोजना केल्या आहेत. भाविकांसाठी रात्री निवास व्यवस्था देखील उपलब्ध करून देण्यात आलेली आहे, तसेच कोणत्याही प्रकारची त्वरित घोषणा आणि सतर्कतेचा इशारा देण्यासाठी ध्वनिक्षेपक देखील मार्गावर स्थापित केले गेले आहेत.
तथापि, सक्रिय पश्चिमी विक्षोभ पुढील २४ तासांत पश्चिम हिमालयीन भागाला प्रभावित करेल. ज्यामुळे, उद्यापर्यंत उत्तराखंडच्या काही भागात मेघगर्जनेसह पाऊस होण्याची शक्यता आहे. त्यानंतर साधारण एक आठवडाभर, पावसाचा जोर वाढण्याची अपेक्षा आहे आणि राज्यात बऱ्याच भागांमध्ये वादळी वाऱ्यासह गडगडाटी पाऊस होण्याची शक्यता आहे.
अशा विस्तृत आणि दीर्घ काळ चालणाऱ्या हवामानाच्या गतिविधींमुळे, यात्रेकरू आणि परिसरातील स्थानिक नागरिकांसाठी अडथळे नक्कीच निर्माण होतील. भूस्खलन होण्याची शक्यता देखील नाकारता येत नाही. स्थानिक पूर देखील येण्याची शक्यता आहे. ज्यामुळे नागरिकांना आवश्यक सावधगिरी बाळगण्याचा सल्ला देण्यात येतो.
शिवाय, या प्रवासाची सुरुवात करण्यापूर्वी तसेच हिमालयातील रस्त्यांचा अनुभव घेण्यासाठी शारीरिकदृष्ट्या स्वतःला सक्षम केले पाहिजे कारण ही यात्रा अत्यंत सुलभ असून पण कठीण आहे.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे