महाराष्ट्रातील बऱ्याच ठिकाणी उष्णतेची लाट अनुभवण्यात येत आहे. मुख्यतः, विदर्भातील भागात बऱ्याच दिवसांपासून गरम हवामानासह उष्णतेची लाट चालू आहे.
सध्याची परिस्थिती पाहता असे दिसून येत आहे, की येणाऱ्या दिवसात सुद्धा राज्यातील बऱ्याच ठिकाणी उष्णतेची लाट अनुभवण्यात येईल. मुख्यतः विदर्भ आणि मराठवाडा मध्ये स्थिती त्रासदायक होईल.
Also read in English: At 48℃, severe heat wave grips Chandrapur in Vidarbha, no relief until June 2
स्कायमेटच्या अंदाजानुसार, पावसाच्या अनुपस्थित, आज पण मध्य महाराष्ट्रात बऱ्याच ठिकाणी उष्णतेची लाट अनुभवली जाईल व मराठवाडा आणि विदर्भात लाटांचा प्रभाव २ जून पर्यंत राहील.
गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्राच्या कमाल तापमानात लक्षणीय वाढ दिसून आलेली आहे. बुधवार रोजी, कमाल तापमान ४८ अंश सेल्सिअससह, चंद्रपूर शहर, सर्वात गरम ठिकाण होते. त्यानंतर, ४७.५ अंश सेल्सिअससह ब्रम्हपुरी शहर होते.
त्याच दिवशी पुण्यात पारा ३९.७ अंश सेल्सिअस पर्यंत पोहोचला होता.
बुधवार रोजी पृथ्वीवरील सर्वात गरम भागांपैकी मध्य भारत एक भाग होते. खरं तर, एल डोरॅडो वेबसाइटने ७:३० वाजता आपल्या अहवालात सांगितले होते की १५ गरम शहरांपैकी ७ शहर मध्य भारतातील आहे. .
मैदानी भागांमध्ये अधिकतम तापमान ४० अंश सेल्सिअस किंवा त्याच्या वरती पोहोचतो, तेम्हा उष्णतेची लाट अनुभवली जाते. तटीय भागांकरता सीमा ३७ अंश सेल्सिअस आहे तर हिमालयी भागांकरता हीच सीमा ३० अंश सेल्सिअस आहे.
सध्या, महाराष्ट्रातील बऱ्याच भागांचे कमाल तापमान सामान्यपेक्षा चार ते पांच अंशांनी जास्त आहे.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे