Skymet weather

[Marathi]नागपूर मध्ये कमाल तापमान ४७.५ अंश सेल्सिअस, उष्णतेच्या लाटेपासून दिलासा नाही

May 28, 2019 6:40 PM |

heat wave in Maharashtra

नागपूर मध्ये आज कमाल तापमान ४७.५ अंश सेल्सिअसवर नोंदवला गेला आहे, जे ह्या हंगामातील सर्वात जास्त तापमान आहेत. येणाऱ्या दिवसात, विदर्भात उष्णतेची लाट अनुभवण्यात येईल, व रहिवाशांना गरम आणि कोरडे वाऱ्यांपासून तूर्तास सुटका नाही मिळणार, असे दिसून येत आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात अत्यंत उष्ण आणि कोरड्या हवामानाची परिस्थिती आहे. खरं तर, उत्तरेकडून येणाऱ्या कोरड्या आणि गरम वाऱ्यांमुळे राज्यातील तापमानात लक्षणीय वाढ झाली आहे. याशिवाय, मे महिन्याच्या सुरुवातीपासून काही दिवस वगळता विदर्भ तीव्र उष्णतेच्या लाटेचा सामना करत आहे.

विदर्भ आणि मराठवाड्यात सोमवारी पाऱ्याने ४६ अंशासह नवीन उंची गाठली. राज्यात सर्वाधिक तापमान ४६.७ अंश सेल्सिअस ब्रम्हपुरी आणि नागपूरमध्ये नोंदले, तर वर्ध्यात ४६.५ अंश, चंद्रपूर मध्ये ४६.४ अंश आणि परभणी येथे ४६.१ अंश तापमान नोंदले गेले.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, पुढील काही दिवस तरी राज्याची उकाड्यापासून सुटका होणार नाही. महत्त्वपूर्ण हवामान व्यवस्थेच्या अनुपस्थितीमुळे, उष्ण व कोरडे वारे महाराष्ट्रात वाहत आहे. हवामानाची हीच परिस्थिती कायम राहण्याची अपेक्षा असून पुढील तीन ते चार दिवसांत महाराष्ट्रातील बहुतेक भागांवर उष्णतेची तीव्र लाट पकड घेण्याची शक्यता आहे.

सध्या कोकण आणि गोवा मध्ये पारा ४० अंशाच्या खाली आहे. एक किंवा दोन जागा वगळता बहुतेक ठिकाणी तापमान ३४ ते ३५ अंशाच्या आसपास आहे. किनारपट्टी क्षेत्र असल्याने, येथे तापमान क्वचितच ४० अंशाचा आकडा ओलांडते, बहुतेकदा पारा पस्तिशीच्या आसपास स्थिरावतो. तथापि, जास्त आर्द्रतेमुळे तापमान कमी असले तरी उकाडा अधिक जाणवतो.

Also read in English: Severe heat wave grips Nagpur, Wardha, Chandrapur as mercury crosses 46 degrees, no relief likely

जूनच्या पहिल्या आठवड्यात कोकण आणि गोव्याला थोडीशी मोकळीक मिळू शकते. महाराष्ट्राच्या किनारीभागावर एक कमी दाबाचा पट्टा विकसित होण्याची अपेक्षा आहे, ज्यामुळे मुंबई, रायगड, सिंधुदुर्ग आणि रत्नागिरी येथे हलक्या पावसाची शक्यता आहे.

यावर्षी वळवाच्या पावसाचा हंगाम महाराष्ट्रासाठी फारच खराब राहिला आहे. आकडेवारीनुसार, कोकण आणि गोवा महाराष्ट्रातील सर्वात कमी पाऊस असलेले क्षेत्र असून इथे पावसाची तूट ९७% आहे. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या इतर तीन विभागांमध्ये १ मार्च ते २७ मे या कालावधीसाठी पावसाची तूट ७५% पेक्षा अधिक आहे तर राज्यात पावसाची तूट ७७% आहे.

Image Credits – Wikipedia

Any information taken from here should be credited to Skymet Weather






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try