कोकण आणि गोवा येथे हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस सुरु राहणार. तसेच, पुढील दोन ते तीन दिवस दक्षिण मध्य-महाराष्ट्रात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने सांगली, सातारा आणि कोल्हापूर यासारख्या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे.
गेल्या दोन-तीन दिवसांपासून कोकण आणि गोव्यात मुसळधार पाऊस झालेला आहे. प्रामुख्याने हर्णे, महाबळेश्वर, डहाणू, रत्नागिरी, मुंबई आणि ठाणे येथे तीन अंकी पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.
Check the live status of lightning and rain across Maharashtra
प्रत्यक्षात या दशकातील सर्वाधिक पाऊस मुंबईत सप्टेंबरमध्ये नोंदवला गेला आहे. तसेच मध्य-महाराष्ट्र, मराठवाडा आणि विदर्भातील काही भागांमध्ये देखील जोरदार ते मध्यम पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.
[yuzo_related]
स्कायमेटच्या अंदाजानुसार, उत्तर मध्य-महाराष्ट्र पासून उत्तर कोंकण व गोवा दरम्यान एक चक्रवाती क्षेत्र आहे. तसेच एक कमी दाबाचा पट्टा दक्षिण गुजरात ते कर्नाटकपर्यंत विस्तारलेला आहे. ज्यामुळे मागील २ दिवसांत राज्यात बऱ्याच ठिकाणी चांगल्या पावसाची नोंद झालेली आहे. सद्यस्थितीत, कमी दाबाचा पट्याचा जोर कमी झालेला आहे आणि तसेच चक्रवाती क्षेत्र गुजरातकडे सरकलेले आहे आणि त्यामुळे मुंबईसह कोकण आणि गोव्यात हलक्या सरी सुरू राहण्याची अपेक्षा आहे.
राज्यातील उर्वरित भागांमध्ये तुरळक सरी होवू शकतात. पुढील दोन ते तीन दिवस दक्षिण मध्य-महाराष्ट्रात देखील हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने सांगली, सातारा आणि कोल्हापूर यासारख्या ठिकाणी पाऊस होण्याची शक्यता आहे. पुण्यात कदाचित मेघगर्जनेसह पाऊस होवू शकतो त्यानंतर मात्र हवामान कोरडे होईल. पुढील २४ तासांत मुंबई आणि कोकण आणि गोवा विभागातील इतर जिल्ह्यांमध्ये हवामान आल्हाददायक राहण्याची शक्यता आहे. त्यानंतर, पुन्हा एकदा तापमान वाढू लागेल.
Image credit: www.trekearth.com
येथून घेतलेल्या कोणत्याही माहितीकरिता skymetweather.com चा संदर्भ देणे अनिवार्य आहे