Skymet weather

[Marathi] संशोधनानूसार वाढत्या समुद्र पातळीमुळे २०५० पर्यंत मुंबई नामशेष होणार

October 31, 2019 6:04 PM |

Mumbai sea

एका नव्या संशोधनानुसार २०५० पर्यंत वाढत्या समुद्राच्या पातळीचा प्रभाव अपेक्षेपेक्षा तीन पट अधिक लोकांवर होण्याची शक्यता असून जगातील किनाऱ्यावरील शहरांसाठी मोठा धोका आहे.

उपग्रह नोंदींवर आधारित भू-उत्थान हे दर्शविते की शतकाच्या मध्यापर्यंत जमिनीवरील सुमारे १५० दशलक्ष लोक उंच भरतीच्या प्रदेशा अंतर्गत येतील. खरं तर, दक्षिण व्हिएतनाम पूर्णपणे नाहीसे होण्याचा धोका आहे. हो ची मिन्ह सिटी, जे आर्थिक केंद्र म्हणून मानले जाते ते समुद्र पातळीच्या वाढीमुळे नाहीसे होईल.

क्लायमेट सेंट्रलचे संशोधक आणि एका शोधनिबंधाचे लेखक स्कॉट ए. कल्प यांच्या मते, 'उपग्रहांचा वापर करून मानक उंचीचे मोजमाप करून जमिनीची उंची झाडे किंवा इमारतींपासून वेगळे करणे कठीण आहे.' अशाप्रकारे, त्रुटी सुधारण्यासाठी त्यांनी 'आर्टिफिशियल इंटेलिजन्स' अर्थात कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर केला आहे.

थायलंडमधील १०% पेक्षा जास्त नागरिक ज्या जमीनीवर राहतात ती २०२० पर्यंत पाण्याखाली जाण्याची शक्यता असून राजधानी बँकॉकला सर्वाधिक झळ पोचण्याची शक्यता आहे.

येत्या काळात हवामान बदल फक्त घातक ठरेल आणि त्यामुळे किनारपट्टीवरील शहरे अधिक प्रभावित होतील, असे देखील संशोधकांनी सांगितले.

स्वप्नांचे शहर मुंबई, जे भारताची आर्थिक राजधानी आणि जगातील सर्वात मोठ्या शहरांपैकी एक आहे, हे २०५० पर्यंत नष्ट होण्याचा तीव्र धोका आहे. इराकमधील दुसर्‍या क्रमांकाचे शहर असलेले बसरा देखील २०५० पर्यंत पाण्याखाली जाण्याची शक्यता आहे.

स्थलांतर आणि विकास या विषयावर समन्वय साधणार्‍या आंतरराष्ट्रीय स्वयंसेवी संघटनेच्या आंतरराष्ट्रीय संघटनेच्या डायना इओन्सको यांच्या म्हणण्यानुसार, 'स्थलांतर वाढेल आणि अधिकाधिक नागरिकांना आंतरिकपणे स्थलांतर करावे लागेल ज्यामुळे राजकीय आणि सामाजिक अस्थिरता वाढेल, त्यामुळे देशांनी आतापासून तयारीस लागावे'.

Image Credits – NDTV

Any information taken from here should be credited to Skymet Weather






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try