Skymet weather

[Marathi] मान्सूनचा हंगाम संपुष्टात, जलाशयांमध्ये दहा वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत २१ टक्के जास्त पाणीसाठा

October 1, 2019 11:50 AM |

Water reservoir in India

सप्टेंबर महिन्यासोबत काल मान्सूनचा हंगाम देखील संपला असून आता विदा आणि एकत्रित आकडेवारी विश्लेषणास सज्ज आहे.

आणखी एक महत्त्वाची माहिती केंद्रीय जल आयोगाकडून (सीडब्ल्यूसी) प्राप्त झाली आहे. यावर्षी जलाशयांतील पाणी साठवणुकीच्या आकडेवारीत असामान्य वाढ झाल्याचे निदर्शनास आले आहे.

केंद्रीय जल आयोग (सीडब्ल्यूसी) अनुसार, या हंगामात सुमारे ११३ जलाशयांमध्ये साठलेले पाणी गेल्या दहा वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत चांगले आहे. या पावसाळ्यामध्ये मागील १० वर्षाच्या सरासरीपेक्षा २१ टक्के जास्त पाणीसाठा शिल्लक आहे.

झारखंड, ओडिशा, पश्चिम बंगाल, त्रिपुरा, नागालँड, उत्तर प्रदेश, उत्तराखंड, मध्य प्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र, गुजरात, हिमाचल प्रदेश, पंजाब आणि राजस्थान या राज्यांसह देशातील सर्वच प्रदेश आणि राज्यांतील जलाशयांची देखरेख व आकडेवारी ठेवली जाते.

या आकडेवारीनुसार ११3 जलाशयांची एकूण उपयुक्त जलसाठा क्षमता १६८.७७ अब्ज क्यूबिक मीटर (बीसीएम) आहे आणि २६ सप्टेंबरपर्यंत त्यांचे संचयन १४६.२ बीसीएम किंवा या क्षमतेच्या ८७% इतके आहे.

उलटपक्षी, याच वेळी, थेट संचयन १२७.२३ बीसीएम (७५%) होते, तर याच कालावधीसाठी मागील १० वर्षाची सरासरी १२१.१८ (७२%) आहे.

थोडक्यात, ११३ जलाशयांमध्ये थेट जलसाठा उपलब्ध झाला असून गेल्या वर्षी याच काळातील संकलनाच्या तुलनेत ११५% असून मागील १० वर्षांच्या सरासरीच्या तुलनेत १२१% जलसाठा आहे.

जवळपास प्रत्येक राज्यात, उपलब्ध संचयन मागील वर्षाच्या संकलन आणि १० वर्षाच्या सरासरीपेक्षा जास्त आहे. अपवाद फक्त पूर्वेकडील भाग आहे जेथे उपलब्ध साठा ८३% असून मागील वर्षाच्या ८४% च्या तुलनेत कमी आहे परंतु गेल्या दहा वर्षांच्या सरासरीपेक्षा ७५% अधिक आहे.

राजस्थान, ओडिशा, नागालँड, गुजरात, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, आंध्र प्रदेश, तेलंगाणा, कर्नाटक आणि तामिळनाडू मध्ये या हंगामात चांगला पाऊस पडल्यामुळे यावर्षीच्या पाणीसाठ्यात गतवर्षीच्या तुलनेत वाढ झाली आहे.

या आकडेवारीमुळे सहजपणे असे दिसून येते की यावर्षी देशात मुसळधार पाऊस कोसळला असून आता मान्सूनचा गडगडाट संपला यात काही शंका नाही.

Image Credits – IBGNEWS.COM

Any information taken from here should be credited to Skymet Weather






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try