[Marathi] मुंबई पाऊस: मुंबईत रेड अलर्ट, एनडीआरएफ तैनात, उद्याही जोरदार सरींची शक्यता

September 4, 2019 2:19 PM | Skymet Weather Team

मुंबईत मुसळधार पावसाने सतत शहरात दडी मारल्यानंतर मुंबई आणि आसपासच्या भागांत जसे ठाणे, पालघर, रायगड येथे पुढील २४ तासांसाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे. इतके की एनडीआरएफला शहरात तैनात करण्यात आले आहेत. तसेच, मिठी नद्यांच्या पाण्याची पातळी वाढत गेल्याने एनडीआरएफचे एक संघ कुर्ला मध्ये तैनात केले आहे.

नवी मुंबईत मोठ्या प्रमाणात पाणी साचले आहे व पुढील २४ तासांसाठी परिस्थिती अशीच कायम राहण्याची शक्यता आहे.

मुंबईत पावसाचा जोर कायम राहील. फ्लाईट्स किमान २५ मिनिटांनी उशीर उडत आहे.

स्थानिक रेल्वेच्या परिस्थितीविषयी बोलताना, मध्य रेल्वेने घोषित केले आहे की मुसळधार पाऊस आणि पुरामुळे कुर्ला ते चुनाभट्टी दरम्यान रेल्वे सेवा बंद आहे. अतिवृष्टी व पाणी साचल्याने विक्रोळी-कांजूरमार्ग दरम्यानच्या सर्व सहा गाड्या थांबविण्यात आल्या आहेत.

पश्चिम रेल्वेच्या बाजूने, माटुंगा ते शीव दरम्यान रेल्वे सेवा थांबवण्यात आली आहे, तर विरार ते वसई रोड दरम्यानच्या गाड्या कमी गतीने धावत आहेत.

मुंबईत पाऊस सुरु राहील आणि शहरात आज दिवसभर मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. शिवाय उद्याही पावसाचा जोर कायम राहील. तथापि, आजच्या तुलनेत पावसाची क्रिया काही कमी होईल, परंतु उद्याही तीन अंकी पाऊस नाकारता येत नाही.

Image Credits – Newsmobile

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES