गेले काही दिवस सातत्याने मान्सूनपूर्व वातावरणात होणाऱ्या वेगवान घडामोडींमुळे आज तिरुअनंतपुरमला जोरदार पर्जन्यवृष्टी झालेली आहे. या झालेल्या पावसामुळे गेल्या १० वर्षातील उच्चांकी पावसाची नोंद जी २०१४ मध्ये (२४५.८) मिमी करण्यात आली होती ती पार करत नवीन उच्चांकी नोंद २९६ मिमी झालेली आहे.
याचबरोबर या शहराची मे महिन्यातील सरासरी पावसाची नोंदही १९८.६ मिमी झालेली असून सरासरीपेक्षा खूप जास्त असल्याचे दिसून आले. शनिवारी तिरुअनंतपुरमला ९८ मिमी पावसाची नोंद करण्यात आली तसेच रविवारीही ९७ मिमी पावसाची नोंद झाली.
भारतातील स्कायमेट या हवामान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार येत्या २४ ते ४८ तासात शहरात मध्यम ते जोरदार स्वरूपाचा पाऊस येतच राहील.
या दक्षिणी द्वीपकल्पला होणाऱ्या जोरदार पावसाचे कारण म्हणजे लक्षद्वीप आणि लगतचा केरळचा काही भाग यावर चक्रवाती हवेचे क्षेत्र निर्माण झालेले आहे.
स्कायमेट या हवामान संस्थेने दिलेल्या अंदाजानुसार हे वातावरणातील बदल आणि जोरदार पाऊस नैऋत्य मान्सूनच्या आगमनाची चाहूल आहे असे म्हणावयास हरकत नाही. तसेच मान्सून हा आधी वर्तविल्यानुसार ३ ते ४ दिवस आधीच अंदमान निकोबार या बेटांवर दाखल झालेला असून लवकरच बंगालचा उपसागर, श्रीलंका पार करत केरळला येईल.
सर्वसाधारणपणे मान्सूनचे आगमन हे दिनांक १ जूनला होत असले तरी या वर्षी मान्सून २७ मे ते २९ मे च्या दरम्यान केरळला दाखल होईल.
Image Credit: paintedstork.com