या वर्षी हवामानाच्या दृष्टीने सर्वात खराब भाग कि जेथे अजिबातच पाऊस झाला नाही ते म्हणजे रायलसीमा, मराठवाडा आणि उत्तर कर्नाटक. या सर्व ठिकाणी गेल्या काही दिवसांपासून व्यापकतेने हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरु आहे. स्कायमेट या संस्थेच्या हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार अजून काही दिवस या भागात पाऊस होणे अपेक्षित आहे आणि त्यामुळे या भागातील पावसाची उणीव काही अंशी भरून निघणार आहे.
सध्या मराठवाडा येथे पावसाच्या कमतरतेचा आकडा ४६%, उत्तर कर्नाटकातील भागात ४४% आणि रायलसीमा येथे ३२% आहे. या भागांच्या भारतातील भौगोलिक स्थानामुळे येथे खुप कमी पाऊस होतो. मान्सूनच्या काळात भारताच्या इतर भागात जसा चांगला पाऊस होतो तो या भागांमध्ये कधीच होत नाही.
नैऋत्य मान्सूनच्या काळात अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात ज्या हवामान प्रणाली तयार होतात त्यांचा परिणाम हा किनारपट्टीला असलेल्या भागात म्हणजेच महाराष्ट्र, कर्नाटक, केरळ यावर आधी होतो मग आतील भागात याचा परिणाम होतो. आणि त्यामुळे मान्सूनच्या लाटेचा परिणाम या भागांवर पोहचेपर्यंत कमी होऊन या भागात हलक्या स्वरूपाचा पाऊस होतो.
गेल्या २ ते ३ दिवसांपासून मराठवाडा, रायलसीमा आणि उत्तर कर्नाटकातील मध्य भागात तुरळक आणि हलक्या स्वरूपाचा पाऊस सुरु आहे. या पावसामुळे या भागातील पावसाची कमतरता भरून निघण्यास मदत होईल.
स्कायमेट या संस्थेने दिलेल्या माहितीनुसार सध्या कमीदाबाचा पट्टा आंध्रप्रदेशच्या किनारपट्टी पासून उत्तर कर्नाटकातील मध्य भागातून पुढे कर्नाटका जवळील अरबी समुद्रातील चक्रवाती अभिसरणा पर्यंत पसरलेला आहे. या मुळे कर्नाटक, रायलसीमा आणि मराठवाड्यातील काही शहरात २७ ऑगस्ट पर्यंत पाऊस सुरु राहील. या सरीं मुळे पावसाची उणीव थोडीफार भरून निघेल.
Image Credit: hindustantimes.com