थोड्या काळ साठी पूर्व मान्सूनची गतिविधी अनुभवण्या नंतर, राजस्थान राज्याचे हवामान मात्र कोरडेच राहिले. गेल्या काही दिवसांपासून येथे कोरडे आणि गरम वारे अनुभण्यात येत आहे, ज्यामुळे राज्यातील तापमानात लक्षणीय वाढ दिसून आली आहे.
काल, श्री गंगानगर येथे कमाल तापमान ४४.६ अंश सेल्सिअस नोंदवला गेला. तसेच, चुरु मध्ये ४४.२ अंश, फळोदी मध्ये ४४.० अंश, बारमेर ४३.९ अंश, जैसलमेर ४३.८ अंश आणि बिकानेर मध्ये ४३.२ अंश सेल्सिअस नोंदवला गेला.
इंग्रेजीत वाचा: Heat wave in parts of Rajasthan, pre-Monsoon rains to bring relief around May 9
वाढत्या तापमानामुळे, राजस्थानच्या बऱ्याच भागात उष्णतेची लाट पुन्हा सुरु झाली आहे, आणि पारा ४५ अंश सेल्सिअस पर्येन्त पोहोचला आहे.
परंतु येणाऱ्या दिवसात, हवामानाची परिस्थिती बदलेल आणि उत्तर व उत्तर पश्चिम भागात ९ व १० मे ला विखुरलेल्या पावसाची शक्यता आहे. परंतु या राज्यातील बाकी भाग मात्र कोरडे राहतील व उष्णतेची लाट अनुभवतील.
परंतु, ११ मे ला, पावसाचा जोर वाढेल आणि राजस्थानचे बाकी भाग पण पाऊस अनुभवतील. १३ व १४ मे ला राजस्थानच्या बहुतांश भागात धुळीचे वादळ किंवा गडगडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे.
पूर्व मान्सून गतिविधीचे कारण आहे, एक पश्चिमी विक्षोभ आणि त्याचा प्रभावाने विस्तार होणारी चक्रवाती परिस्थिती. या शिवाय, अरब सागर पासून येणारे आर्द्र वारे.
आमची अपेक्षा आहे कि १२ ते १६ मे च्या मध्ये राजस्थानच्या बऱ्याच भागात धुळीचे वादळ किंवा गडगडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. पावसामुळे उष्णतेच्या लाट पासून पण सुटका मिळेल.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे