[Marathi] महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होणार, कोंकणात मध्यम पाऊस सुरु राहणे अपेक्षित

July 10, 2019 12:17 PM | Skymet Weather Team

मुंबईसह उत्तर कोंकण व गोव्यात पावसाचा जोर कमी झालेला आहे आणि येथे गेल्या २४ तासांत, हलक्या ते मध्यम पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. याउलट, दक्षिण कोंकण व गोव्यावर दक्षिण पश्चिम मान्सून सक्रिय असून, येथे काही ठिकाणी चांगल्या पावसाची नोंद झाली आहे. याशिवाय, नाशिक, पुणे, सातारा, कोल्हापूर आणि सांगली मध्ये मध्यम स्वरूपाचा पाऊस पडलेला आहे. दुसरीकडे, मालेगाव, जळगाव आणि मराठवाड्यातील भागात हवामान मात्र कोरडेच राहिले आहे.

मंगळवार रोजी ८:३० वाजता पासून घेऊन ते गेल्या २४ तासांत, महाबळेश्वर मध्ये १०० मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे, त्यानंतर माथेरान आणि रत्नागिरी मध्ये ५३ मिलीमीटर, चंद्रपूर मध्ये ४९ मिलीमीटर, वेंगुर्ला मध्ये ३५ मिलीमीटर आणि हर्णै मध्ये ३१ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.

स्कायमेटच्या अनुसार, येणाऱ्या दिवसांत, महाराष्ट्रातील अंतर्गत भागात पावसाचा जोर कमी होणे अपेक्षित आहे व मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील भागात काही ठिकाणी विखुरलेल्या पावसाची शक्यता आहे. दरम्यान, दक्षिण कोंकण व गोव्यात मुख्यतः मध्यम स्वरूपाच्या पावसासह एक दोन ठिकाणी जोरदार सरींची शक्यता आहे.

पुढे, २४ ते ४८ तासानंतर, उत्तर कोंकण व गोव्यात पाऊस कमी होईल व ठाणे, पालघर, डहाणू आणि मुंबई या ठिकाणी हलक्या पावसाची अपेक्षा आहे.

१४ आणि १९ जुलैच्या मध्ये, महाराष्ट्रातील बहुतांश अंतर्गत भागांमध्ये पाऊस कमी होईल. या कालावधीत, कोंकण व गोव्यात सुद्धा पावसाचा जोर कमी होणे अपेक्षित आहे.

प्रतिमा क्रेडीट: इंडिया टुडे 

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES