विदर्भ आणि उत्तर महाराष्ट्रात गेल्या २४ तासांत मध्यम सरी बरसल्या. दरम्यान, कोकण, गोवा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रात तुरळक हलका पाऊस पडला आहे.
मागील २४ तासांच्या कालावधीत चंद्रपुरात ३१ मिमी, जळगाव २५ मिमी, वर्धा ५ मिमी, अमरावती ३ मिमी, कुलाबा (मुंबई) २ मिमी, डहाणू २ मिमी, कोल्हापूर १ मिमी, सांताक्रूझ (मुंबई) ०.८ मिमी, सोलापूर ०.७ मिमी आणि परभणी ०.५ मिमी पावसाची नोंद झाली.
स्कायमेट हवामानशास्त्रज्ञांच्या अनुसार, कमी दाबाचा पट्टा दक्षिण राजस्थान आणि त्याच्या आसपासच्या क्षेत्रावर आहे. या हवामान प्रणालीभोवती आर्द्रतेचे प्रमाण कमी आहे, म्हणूनच पुढच्या काही दिवसांत संपूर्ण महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी राहील. मान्सूनच्या परतीस लवकरच सुरुवात होणार असल्याने पावसाळी गतिविधी देखील आता कमी होतील.
येत्या ५ ते ८ ऑक्टोबर दरम्यान मध्य महाराष्ट्रासह कोकण आणि गोव्यातील काही भागात मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे, परंतु जोर कमी असल्यामुळे पूर किंवा सखल भागात पाणी साचण्याची समस्या उद्भवणार नाही.
हवामान आल्हाददायक राहील, तथापि, कमी पावसाच्या कारणास्तव, तापमान वाढण्यास सुरवात होवून दिवस उबदार होईल.
या मान्सून हंगामात मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोवा या विभागांमध्ये अधिक पाऊस झाला आहे. खरं तर, दोन्ही विभाग अलीकडच्या काळात पूर परिस्थितीतून गेले होते.
मुसळधार ते अति मुसळधार पावसामुळे या हंगामात जवळपास १० प्रसंगात व्यापक नुकसान झाले होते. त्याचप्रमाणे, दक्षिण मध्य महाराष्ट्रातील सांगली आणि सातारा यासारख्या ठिकाणांना ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात पूरचा सामना करावा लागला.
१ जून ते ३० सप्टेंबर दरम्यान झालेल्या पावसाच्या आकडेवारीनुसार विदर्भात १२ टक्के जास्त पाऊस झाला आहे. याउलट मराठवाड्यात सरासरीपेक्षा १२% कमी पाऊस पडला असला तरी गेल्या काही वर्षांच्या तुलनेत हा मान्सून चांगला होता.
Image Credits – Maharashtra today
Any information taken from here should be credited to Skymet Weather