[Marathi] मुंबई, नागपूर, पुणे, नाशिकमध्ये सातत्याने तुरळक पाऊस होण्याची शक्यता.

August 1, 2018 2:52 PM | Skymet Weather Team

दोन दिवसांपूर्वी मध्यम पाऊस झाल्यानंतर महाराष्ट्र राज्यातील पावसाची तीव्रता आता कमी होत चालली आहे.तथापि, कालच्या पर्जन्यमानाच्या तुलनेत, राज्यातील पावसाच्या तीव्रतेच्या दृष्टीने आज किरकोळ सुधारणा दिसून आली आहे.

गेल्या 24 तासांत पाऊस मुख्यतः दक्षिण कोकण आणि मध्य महाराष्ट्र मध्ये पडला . विदर्भातील काही भागात देखील थोडा पाऊस नोंदवीला गेला. तथापि, मराठवाडा विभाग माञ कोरडा राहिला होता. मंगळवारी सकाळी ०८:३० पासून २४ तासाच्या कालावधीमध्ये महाबळेश्वर येथे १८ मिमि पाऊस , औरंगाबाद ९ मिमी, मुंबई कुलाबा २ मिमी, कोल्हापूर 2 मि.मी, सांगली १ मि.मी., वेंगुर्ला ०.८ मिमी, पुणे ०.२मिमी, नाशिक १ मिमी आणि रत्नागिरी ०. ५ मिमी अशी पावसाची नोंद झाली आहे.

स्काय मेट वेदर च्या हवामान अंदाजानुसार दक्षिण कोकण मध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो . मध्य महाराष्ट्रातील काही भागांन हलका पाऊस प्राप्त होईल. दरम्यान, मराठवाड्यात हवामान कोरडे राहील अशी शक्यता आहे.

[yuzo_related]

हवामानाचा कृषी घटकावर होणारा परीणाम पाहू;

कोकण मधील शेतकरी मित्रांनी स्फुरद,पालाश यांचा दुसरा डोस तांदूळ पिकाला द्यावा तसेच कीड होऊ नये म्हणून काळजी घ्यावी कारण ढगाळ हवामानामुळे कीड पटकन होऊ शकते . मराठवाड्यामधील शेतकरी बंधूनी सुद्धा कीटकनाशकाचा उपयोग करून कीड कमी  करावी ,भेंडी ला जर अळी लागली असेल तर तो तेवढा भाग काढून टाकावा .मध्य महाराष्ट्रामधील शेतकरी बंधूनी आंतरमशागतीची कामे पूर्ण करावीत ,तसेच करीफ पिकाची कमी पाऊस असेल तर  पाणी देऊन काळजी घ्यावी.

Image Credit: YouTube   

येथूनघेतलेल्याकोणत्याहीमाहितीचेश्रेयskymetweather.com लाद्यावे

OTHER LATEST STORIES