[Marathi] दक्षिण कोंकणात मॉन्सूनच्या पावसाचा जोर कमी, विदर्भ आणि मराठवाड्यात पाऊस वाढणे अपेक्षित

June 21, 2019 1:00 PM | Skymet Weather Team

जोरदार पावसामुळे काल दक्षिण कोंकण व गोव्या मध्ये दक्षिण पश्चिम मॉनसून २०१९ चे आगमन झाले होते. तथापि, तेव्हापासून, विभागात पावसाचा जोर कमी झालेला आहे. गेल्या २४ तासात, वेंगुर्ला मध्ये ३० मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. सध्या, मॉन्सूनची उत्तर सीमा रत्नागिरी आणि कोल्हापूरला पार करून पुढे जात आहे.

याउलट, महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात, विशेषत: विदर्भात पावसाचा जोर वाढलेला आहे. विभागातील पूर्व भागात मुख्यतः गडचिरोली मध्ये गेल्या २४ तासात ३०.२ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.

झालेल्या पावसाचे कारण आहे, ओडिशा आणि आंध्रप्रदेशच्या किनारपट्टीजवळ बनलेला एक कमी दाबाचा पट्टा. ही प्रणाली दक्षिण पश्चिम दिशेत पुढे जाऊन महाराष्ट्राच्या जवळ पोहोचत आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, ही हवामान प्रणाली महाराष्ट्राच्या जवळ येताच येथे पावसाची लक्षणीय वाढ होईल. अशा प्रकारे, आज विदर्भात विखुरलेल्या हलक्या पावसाची अपेक्षा आहे तर मराठवाड्या मध्ये आज आणि उद्याही जोरदार पावसाची अपेक्षा आहे.

याउलट, मुंबईसह उत्तर कोकण आणि गोव्या मध्ये तीव्र पाऊस अनुभवण्यासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल. तथापि, येथे २३ जून पर्यंत येथे हलका पाऊस पडत राहणे अपेक्षित आहे.

दक्षिण पश्चिम मॉन्सून २०१९ चे अखेरीस दक्षिण कोंकण व गोव्या मध्ये आगमन झाले आहेत आणि पुढील दोन ते तीन दिवसांत मराठवाड्याच्या काही भागात मॉन्सूनची प्रगती होण्याची शक्यता आहे.२५ किंवा २६ जून दरम्यान मॉन्सून मुंबई आणि महाराष्ट्रातील इतर भागांमध्ये प्रवेश करणे अपेक्षित आहे.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES