[Marathi] चक्रीवादळ वायु कमकुवत झाल्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर कमी होणे अपेक्षित

June 18, 2019 3:52 PM | Skymet Weather Team

चक्रीवादळ वायुच्या प्रभावामुळे महाराष्ट्रातील दक्षिण कोकण भागांवर गेल्या अनेक दिवसांपासून दक्षिण-पश्चिम वारे वाहत होते. या वाऱ्यांमुळे महाराष्ट्राच्या किनारी भागांवर चांगल्या पावसाची नोंद करण्यात येत होती.

गेल्या २४ तासात, महाबळेश्वर मध्ये १६ मिलिमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे, डहाणू मध्ये १३ मिलीमीटर, हर्णै मध्ये १२ मिलीमीटर आणि कोलाबा मध्ये ७ मिलीमीटर पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.

महाराष्ट्रातील १० सर्वात पावसाळी ठिकाण येथे पहा:

स्कायमेटच्या अंदाजानुसार, चक्रीवादळ वायु आता कमकुवत झाले आहे ज्यामुळे दक्षिण कोंकण व गोव्यावर पावसाची तीव्रता कमी होणे अपेक्षित आहे. अशा प्रकारे मुंबईसह तटीय भागात २३ जूनपर्यंत हलका पाऊस सुरू राहील, अशी अपेक्षा आहे. त्यानंतर पावसाचा जोर वाढण्याची अपेक्षा आहे.

महाबळेश्वर, डहाणू, हर्णै आणि कोलाबा (मुंबई), यासारख्या ठिकाणी पुढील काही दिवसांत हलक्या पावसाची नोंद करण्यात येईल.

शिवाय, पुढील दोन ते तीन दिवस महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात तुरळक पावसाची अपेक्षा आहे.

पुढे, २१ जूनच्या आसपास, पश्चिम बंगालच्या पश्चिम मध्य खाडीत एक कमी दाबाचा पट्टा बनण्याची अपेक्षा आहे. या प्रणालीमुळे, बंगालच्या खाडीपासून आर्द्र वारे विदर्भ आणि मराठवाड्या येथे वाहतील. तसेच, उत्तर मध्य प्रदेश पासून ते उत्तर कोकण आणि गोवा पर्यंत एक ट्रफ रेषा विकसित होण्याची शक्यता आहे. याव्यतिरिक्त, उष्ण आणि आर्द्र दक्षिण-पश्चिम वारे उत्तर -पूर्व दिशेने येणाऱ्या वाऱ्यांशी मिळतील. परिणामी एक कॉन्फ्लुएंझ झोन तयार होईल.

या हवामान प्रणालीमुळे, विदर्भ आणि आसपासच्या भागात २१ जून रोजी चांगल्या पावसाची सुरूवात होईल. खरं तर, २१ ते २५ जून दरम्यान विदर्भ आणि मराठवाडाच्या काही भागात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.

वाढलेल्या हवामानाच्या क्रियाकलापांमुळे महाराष्ट्रावर दक्षिण-पश्चिम मॉन्सूनचे आगमन लवकरच होणे अपेक्षित आहे.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES