[Marathi] महाराष्ट्रातील अंतर्गत भागात पावसाचा जोर कमी होण्याची अपेक्षा

July 11, 2019 12:18 PM | Skymet Weather Team

सक्रिय मान्सूनमुळे गेल्या २४ तासांत, कोंकण व गोव्यात जोरदार पाऊस पडला आहे. तसेच, मुंबईतील बहुतांश भागांमध्ये याच कालावधीत चांगल्या पावसाची नोंदी झाली आहे.

महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांविषयी बोलताना, मध्य महाराष्ट्रात चांगला पाऊस अनुभवण्यात आलेला आहे, त्यात नाशिक, पुणे, कोल्हापूर, सांगली आणि सातारा येथे मध्यम पाऊस नोंदवला गेला आहे. त्याचप्रमाणे, मराठवाड्यात काही ठिकाणी चांगल्या पावसाची नोंद झाली आहे, त्यात औरंगाबाद, जालना आणि बीर, विशेषतः, या ठिकाणी मध्यम स्वरूपाचा पाऊस पडला आहे.

चालू असलेल्या चांगल्या पावसामुळे कोकण आणि गोवा क्षेत्रामध्ये पाऊस अधिशेष १४ टक्के ने वाढला आहे. त्याचप्रमाणे, मान्सूनच्या पावसामुळे मध्य महाराष्ट्रातील भागात पावसाची कमतरता कमी झाली आहे, यामुळे या क्षेत्रात १३ टक्के जास्त पाऊस पडला आहे. दुसरीकडे, मराठावाडा आणि विदर्भावर आतापर्यंत पाऊस कमीच राहिलेला आहे ज्यामुळे येथे ३४ टक्के आणि २० टक्के अनुक्रमे पावसाची कमतरता नोंदवण्यात आली आहे.

गेल्या २४ तासांत बुधवारी रात्री ८:३० वाजता पासून माथेरानने २३२ मिमी पावसाची नोंद केली आहे. त्यानंतर वेंगुर्लाने १२९ मिमी, महाबळेश्वरने १२३ मिमी, अलीबागने ८२ मिमी, कोलाबा (मुंबई) ७२ मिमी, हर्णै ७१ मिमी, सांता क्रूझ (मुंबई) ५० मिमी, रत्नागिरी ४६ मिमी, ठाणे (मुंबई) ४५ मिमी आणि औरंगाबाद ३३ मिमी, जालना आणि बीर येथे ७ मिमी पाऊस झाला आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, कोंकण आणि गोवा येथे पावसाची तीव्रता कमी होईल. विशेषतः उत्तर जिल्ह्यांत कमी तीव्रतेने पाऊस पडेल, ज्यात मुंबई, ठाणे आणि डहाणू येथे हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे.

त्याचप्रमाणे उत्तर मध्य महाराष्ट्रातील भागात जसे जळगाव, नाशिक, मालेगाव आणि पुणे येथे केवळ हलक्या पावसाची नोंद होईल.

पुढे, दोन दिवसानंतर, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र यासह महाराष्ट्रातील जवळजवळ सर्व आंतरिक भाग मुख्यतः कोरडे हवामान अनुभवतील, तथापि, एक दोन ठिकाणी हलक्या पावसाची अपेक्षा नाकारता येणार नाही. याशिवाय, १६ जुलै किंवा १७ जुलैपर्यंत या भागांवर पावसाचे प्रमाण कमी राहण्याची अपेक्षा आहे. दरम्यान, कोकण आणि गोवाच्या दक्षिणेकडील जिल्ह्यांत हलका ते मध्यम पाऊस सुरू राहील.

Image Credits – Swarajya 

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES