गेल्या २४ तासांत मराठवाडा, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात पावसाचा जोर कमी झालेला आहे. तथापि, याच कालावधीत दक्षिण कोकण आणि गोवा येथे चांगला पाऊस पडला आहे.
गेल्या २४ तासांत, रविवारी सकाळी ८:३० वाजता पासून, महाबलेश्वरमध्ये ८९ मिमी पावसाची नोंद झाली आहे, त्यानंतर हर्णै मध्ये २८ मिमी, माथेरान मध्ये २३ मिमी, वेंगुर्ला मध्ये २० मिमी, अलीबाग मध्ये १० मिमी, ब्रम्हापुरी मध्ये ७ मिमी, बुलडाणा मध्ये ४ मिमी, सातारा मध्ये ४ मिमी, कोलाबा (मुंबई) मध्ये ३ मिमी आणि सांताक्रूझ (मुंबई) मध्ये ३ मिमी पाऊस झाला आहे.
स्कायमेटच्या अंदाजानुसार, मान्सूनचा पाऊस कमीतकमी पुढील तीन ते चार दिवस महाराष्ट्राच्या अंतर्गत भागांवर कायम राहील. तथापि, पावसाचा जोर कमीच राहणे अपेक्षित आहे.
दरम्यान, मुंबईसह उत्तर कोंकण आणि गोवा येथे पुढील काही दिवस कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, कोकण आणि गोवा मधील दक्षिणेकडील जिल्ह्यांत ४८ ते ७२ तास मध्यम स्वरूपाचा पाऊस पडत राहील.
आमच्या हवामानशास्त्रज्ञांच्या मते, दक्षिण कोकण आणि गोवा येथून केरळ पर्यंतच्या किनार्यावरील समुद्र किनाऱ्यावर बनलेल्या ट्रफ रेषेमुळे, दक्षिण कोकण क्षेत्रात सक्रिय मान्सून पाऊस देण्यास जबाबदार आहे.
याशिवाय, १९ जुलै रोजी विदर्भ आणि मराठवाड्यातील भागात पुन्हा पावसाचा जोर वाढण्याची अपेक्षा आहे. या कालावधीत मराठवाड्यातील भागात काही ठिकाणी चांगल्या पावसाची शक्यता आहे.
एक कमी दाबाचा पट्टा बंगालच्या खाडीच्या पश्चिम मध्य भागांवर विकसित होईल. ही प्रणाली हळूहळू पश्चिम-दिशेने प्रवास करेल आणि तेलंगाना तसेच विदर्भ आणि मराठवाड्याच्या भागांजवळ पोहोचेल, ज्यामुळे महाराष्ट्रात पावसाचा जोर वाढणे अपेक्षित आहे.
चालू असलेल्या चांगल्या पावसामुळे कोकण आणि गोवा महाराष्ट्राचा एकमेव हवामान विभाग आहे जेथे अधिशेष पाऊस झाला आहे. याशिवाय, मध्य महाराष्ट्रात पावसाची कमतरता १५% (सामान्य श्रेणी) आहे. तथापि, कमी पाऊस असल्यामुळे विदर्भातील आणि मराठवाड्यातील भागात पावसाची कमतरता नोंदवण्यात आली आहे.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे