गेल्या काही दिवसापासून मान्सून ची बरसात महाराष्ट्र राज्यात चालू आहे. तथापि, या पावसाची तीव्रता कोकणपर्यंत आणि विदर्भातील काही भागांवर जास्त प्रमाणात राहिली, दुसरीकडे मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्र या ठिकाणी माञ तीव्रता कमी होती.
रविवारी सकाळी ०८. ३० पासुन रत्नागिरी येथे ७० मिमी एवढी पावसाची नोंद झाली तर , परभणी ५४ मिमी, चंद्रपूर ४७ मिमी, गोंदिया ३९ मिमी, वेंगुर्ला ३६ मिमी, हर्णै २७ मिमी, यवतमाळ २३ मिमी, डहाणू २२ मिमी, महाबळेश्वर ८. २ मिमी, वर्धा ४ मिमी, मुंबई सान्ता क्रूज़ वेधशाळा ०. ४ मिमी , कुलाबा १ मिमी एवढी नोंद झाली आहे.
स्काय मेट वेदर च्या हवामान अंदाजानुसार कमी दाबाचा पट्टा सध्या कमी झाला आहे व वारे दक्षिण महाराष्ट्राकडून लक्षद्वीप किनाऱ्याकडे वाहत आहेत . स्काय मेट वेदर च्या हवामान अंदाजानुसार पुढील काही तासात कोकण मध्ये चांगला पाऊस होईल अशी शक्यता आहे ,तसेच मुबंई मध्ये ४ जुलै पासुन पावसाची तीव्रता वाढू शकते.
तथापि विदर्भ मध्ये पुढील २४ ते ४८ तासात हलका ते मध्यम स्वरूपात पाऊस होऊ शकतो तर मध्य महाराष्ट्र व मराठवाडा येथे माञ तुरळक पाऊस होऊ शकतो.
हवामानाचा कृषी घटकावर होणारा परीणाम पाहू;
कोकण मधे चांगला पाऊस होत आहे त्यामुळे शेतकरी बंधूनी भाताची लावणी सुरु ठेवावी ,खेकडा नियंत्रणासाठी कीटकनाशकाचा वापर करावा. पाले भाज्या लावल्या असतील तर त्यांना काठी इत्यादी लावून आधार द्यावा म्हणजे वाऱ्यापासून नुकसान होणार नाही . तसेच खत योग्य प्रमाणात घालावी . विदर्भातील शेतकरी मित्रांनी कापूस पेरणी सुरू करावी, पेरणी स्थानिक जमिनीतील ओलावा आणि पाऊस याचा विचार करून मग करावी.
भुईमूग पेरणी 7 जुलै पूर्वी करून पूर्ण पाहिजे ,त्यामुळे कीड कमी लागते. वाटाणा लावण्यापूर्वी कीड लागू नये व जास्ती उत्पादन मिळावे म्हणून त्याला बीजप्रक्रिया करावी.
Image Credit: YouTube
येथूनघेतलेल्याकोणत्याहीमाहितीचेश्रेयskymetweather.com लाद्यावे.