गेल्या दोन दिवसांत पावसाळी गतिविधी फक्त उत्तर कोकण आणि गोवा व मध्य महाराष्ट्रात नोंदवण्यात येत आहे. तथापि, दक्षिण कोकण आणि गोव्यात चांगला पाऊस सुरू असून, वेंगुर्लामध्ये २४ तासांच्या कालावधीत १५४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
स्कायमेटनुसार आता विदर्भातील बहुतेक भागांवर मान्सूनच्या पावसाला पुन्हा सुरुवात होईल. खरं तर मराठवाड्यातील अनेक जिल्हे तर विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये प्रामुख्याने नांदेड, परभणी, लातूर, ब्रह्मपुरी आणि नागपूरसारख्या जिल्ह्यांत हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अनुभवण्यात आला आहे.
मागील २४ तासात ब्रह्मपुरीमध्ये ५४ मिमी, नागपूर ३ मिमी, वर्धा ५ मिमी, गोंदिया १ मिमी, नांदेड ६ मिमी, परभणी ९ मिमी आणि लातूर येथे ११ मिमी पावसाची नोंद झाली आहे.
बंगालच्या खाडीवर बनलेल्या कमी दाबाच्या पट्ट्यामुळे हा पाऊस होत आहे. ही प्रणाली पश्चिम भागात दिशेने प्रवास करेल, ज्यामुळे पुढील २४ तासांत विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाळी गतिविधिंमध्ये हळूहळू वाढ होईल. काही काळानंतर मध्य-महाराष्ट्रात देखील पावसाळी गतिविधिंमध्ये वाढ होईल. तथापि, मुंबईकरांना पावसासाठी काही काळ प्रतीक्षा करावी लागेल.
आज संध्याकाळी पासून विदर्भ आणि मराठवाड्यात चांगल्या पावसाला सुरुवात होण्याची अपेक्षा आहे, आणि उद्यापासून, मध्य महाराष्ट्रात देखील पावसाला सुरुवात होईल.
पुढे, २० आणि २३ जुलै दरम्यान, आम्ही अपेक्षा करतो की महाराष्ट्रातील बऱ्याच भागांमध्ये एक दोन जोरदार सरींसह हलका ते मध्यम पाऊस पडेल. तसेच २३ जुलै पासून मुंबईत पुन्हा एकदा पावसाला सुरुवात होईल आणि २६ जुलैपर्यंत सुरु राहणे अपेक्षित आहे. दरम्यान या कालावधीत कोकण आणि गोव्यात मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे.
प्रतिमा क्रेडीट: इंडिया टूड़े
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे