पुराचा पाऊस रोखल्यानंतर सांगली, सातारा आणि कोल्हापुरात पावसाच्या गतिविधींमध्ये लक्षणीय घट झाली आहे. आणि गेल्या दोन दिवसांपासून या भागात केवळ हलका पाऊस सुरू आहे.
आमच्या हवामानशास्त्रज्ञांच्या म्हणण्यानुसार आगामी काळात सांगली, सातारा आणि कोल्हापूरमध्ये मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता नाही आहे आणि केवळ हलका पाऊस सुरु राहील. दक्षिण मध्य महाराष्ट्रातील इतर भागातही अशीच स्थिती असण्याची शक्यता आहे. तथापि, दक्षिण कोकण आणि गोवा येथे मध्यम पावसासह काही जोरदार सरींची शक्यता आहे. केवळ हलक्या ते मध्यम तीव्रतेमध्ये पाऊस पडेल, त्यामुळे सांगली, सातारा आणि कोल्हापूर येथे पूर परिस्थिती निर्माण होण्याची अपेक्षा नाही आहे.
पावसाचे प्रमाण कमी होण्याचे कारण मान्सूनची दुर्बल झालेली लाट आहे.
हवामान आरामदायक आणि ढगाळ वातावरणासह राहील. एक किंवा दोन मध्यम सरींची देखील आज शक्यता आहे. पुढील चार ते पाच दिवस मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता नाही. पावसाचा जोर कमीच असल्यामुळे जन जीवन विस्कळीत होणार नाही.
केवळ मध्य महाराष्ट्रच नाही तर महाराष्ट्राच्या इतर हवामान विभागातही पावसाचा जोर कमी झाला आहे. कमी झालेल्या पावसामुळे आता पुराचे पाणी कमी होऊ शकते आणि परिस्थिती नियंत्रणात येऊ शकते.
Image Credits – Maharashtra today
Any information taken from here should be credited to Skymet Weather