[Marathi] काश्मीर, हिमाचल आणि उत्तराखंड मध्ये पावसाचा जोर वाढणार, गारपिटीची पण शक्यता

May 20, 2019 9:44 AM | Skymet Weather Team

यावर्षी, मे महिन्यात जम्मू-काश्मीर व हिमाचल प्रदेश मध्ये चांगल्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. साधारणपणे, मे महिन्यात पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव कमी होऊ लागतो, ज्यामुळे पावसाचा जोर देखील जम्मू काश्मीर व हिमाचल प्रदेश मध्ये कमी होतो, परंतु यावर्षी, चांगल्या पावसामुळे दोन्ही राज्यात पावसाची कमतरता नाही जाणवत आलेली आहे.

यावर्षी, मे महिन्याच्या सुरुवाती पासूनच एका नंतर एक पश्चिमी विक्षोभाने उत्तर भारताला प्रभावित केलं आहे व आता पर्यंत हवामान प्रणालीचा येणं जाणं चालू आहे, ज्यामुळे उत्तर भारत विविध हवामान प्रणालीने प्रभावित होतात आहे.

तसेच, आज पण जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड मध्ये हलक्या पावसाची शक्यता आहे. खरं तर, उद्या पण स्थिती अशीच बनलेली राहील, असे दिसून येत आहे.

Also read: Rains to increase in Kashmir, Himachal and Uttarakhand, snowfall and hailstorm in few parts

उद्या संध्याकाळ पर्यंत, एक अजून पश्चिमी विक्षोभ उत्तर भारता जवळ पोहोचेल, ज्यामुळे, पावसाचा जोर येथे वाढणे अपेक्षित आहे. तिन्ही राज्यात, मेघगर्जनेसह पावसाची २२ मे पर्यंत शक्यता आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, येणाऱ्या तीन ते चार दिवसात, पश्चिम हिमालयवर पाऊस अनुभवला जाईल. जम्मू काश्मीर, हिमाचल प्रदेश व उत्तराखंड मध्ये एक दोन ठिकाणी बर्फवृष्टी आणि गारपिटीची पण शक्यता आहे.

याशिवाय, एक दोन ठिकाणी भूस्खलन, म्हणजे माती घसरून पडण्याची पण शक्यता आहे. पर्यटक सावध राहावे, असा सल्ला देण्यात येत आहे.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES