[Marathi] मुंबई, नागपूर, नाशिक, वेंगुर्ला येथे मान्सूनचा पाऊस परत एकदा बरसणार

July 16, 2018 3:46 PM | Skymet Weather Team

 

काल संपूर्ण दिवसभरात महाराष्ट्रामध्ये मान्सूनचा जोरदार पाऊस झाला आहे. राज्यातील बहुतेक भाग, विशेषतः कोकण विभागाने अतिशय जास्त पाऊस नोंदवला आहे.

स्काय मेट वेदर च्या हवामान अंदाजानुसार कोकणामध्ये मध्यम ते जास्ती स्वरूपाचा पाऊस सुरूच राहील दरम्यान, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये मध्यम ते हलक्या पावसाची नोंद झाली आहे.दुसरीकडे मराठवाड्या मध्ये थोडा कमी पाऊस झाला आहे.

रविवारी सकाळी ०८:३० पासून २४ तासात , ठाणे येथे १७५ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर मुंबई ९५ मिमी, डहाणू ८७ मिमी, गोंदिया ८६ मिमी, चंद्रपूर ५४ मिमी, वेंगुर्ला ४६ मिमी, सातारा २७ मिमी, नाशिक ३७ मिमी, ब्रह्मपुरी ३२ मिमी, कोल्हापूर २६ मिमी, बुलढाणा २१ मिमी, आणि नागपूर १६मिमी एवढी पावसाची नोंद झाली आहे.

[yuzo_related]

स्काय मेट वेदर च्या हवामान अंदाजानुसार सध्या दक्षिण गुजरात च्या किनारपट्टीवर एक चाकरी वादळ निर्माण होण्याची शक्यता आहे त्यामुळेच पुढील २४ तासात कोकणामध्ये मध्यम ते हलक्या स्वरूपाचा पाऊस होऊ शकतो त्यानंतर माञ उत्तर कोकणचा पाऊस थोडा कमी होईल व दक्षिण कोकणचा पाऊस सुरूच राहील.

त्याचप्रमाणे ओडिसा च्या सागरी किनाऱ्यावर कमी दाबाचा पत्ता निर्माण झाल्यामुळे विदर्भामध्ये मुसळधार पाऊस होऊ शकतो. तथापि मराठवाड्यामध्ये माञ अतिशय कमी पावसाची शक्यता आहे.

हवामानाचा कृषी घटकावर होणारा परीणाम पाहू;

कोकण मधे मुसळधार पाऊस होऊ शकतो त्यामुळे शेतकरी बंधूनी राहिलेला भात लावून घ्यावा ,तसेच शेतातील जास्तीचे पानी काढून टाकावे. सुपारी व नारळाच्या बागेतील साचलेले पाणी पण काढून टाकावे.

विदर्भातील शेतकरी बंधूनी खरिफ पीक लावण्याआधी कीटकनाशकाची बीज प्रक्रिया करावी. मराठवाड्यातील शेतकरी बंधूनी कापूस,सोयाबीन या पिकांना कीड लागू नये म्हणून काळजी घ्यावी.

Image Credit: Wikipedia  

येथूनघेतलेल्याकोणत्याहीमाहितीचेश्रेयskymetweather.com लाद्यावे

OTHER LATEST STORIES