हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंडमध्ये मुसळधार पावसाने थैमान घातल्यानंतर आता दोन्ही राज्यांत पावसात लक्षणीय घट झाली आहे. हिमाचल प्रदेश आणि उत्तराखंड या दोन्ही डोंगराळ भागात हवामान जवळजवळ कोरडे झाले आहे. आता पावसाचा जोर कमी राहणार असल्याने या राज्यांना पूर परिस्थितीतून थोडा दिलासा मिळणार आहे.
हिमाचल प्रदेशात स्वच्छ हवामान राहणार असून हे मदत आणि बचावकार्यात मदत करेल. याउलट मात्र उत्तराखंडमध्ये पुढील ४८ तास काही अडचणी येऊ शकतात.
तथापि, उत्तराखंडमध्ये २३ ऑगस्टपर्यंत थोड्या मध्यम स्वरूपासह विखुरलेला हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. तथापि, अतिवृष्टी किंवा ढगफुटीची शक्यता नाही. जम्मू-काश्मीर मध्ये देखील हवामान स्वच्छ राहण्याची शक्यता आहे.
नुकत्याच झालेल्या मुसळधार पावसामुळे दोन्ही राज्यांत सर्वत्र पूर आला असून ढगफुटी आणि दरडी कोसळल्याने अनेकांचे नुकसान झाले आहे. तसेच मालमत्तेचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. पावसाचा जोर कमी होणे अपेक्षित असले तरी पूर कमी होण्यास वेळ लागेल.
मंगळवारी रात्रीपर्यंत, भूस्खलन आणि पावसाशी संबंधित घटनांनी हिमाचल प्रदेशात आतापर्यंत ३० लोकांचा बळी घेतला आहे. सर्व प्रमुख मार्गांवर पावसामुळे परिणाम झाला असल्याने अनेक पर्यटक अजूनही वेगवेगळ्या भागात बेपत्ता आहेत.
Image Credits – The Hindu
Any information taken from here should be credited to Skymet Weather