[Marathi] दिल्ली, नोएडा, गुरुग्राम आणि फरिदाबाद मध्ये १७ मे पर्यंत पावसाची शक्यता

May 15, 2019 10:51 AM | Skymet Weather Team

१३ मे पासून, पूर्व मॉन्सूनच्या गतिविधी जसे धुळीचे वादळ, मेघगर्जनेसह पाऊस दिल्ली, नोएडा, गुरुग्राम, फरिदाबाद आणि गाझियाबाद मध्ये अनुभवण्यात येत आहे.

१४ मे ला या गतिविधींचा जोर किंचित कमी होता परंतु आज सकाळी दिल्ली आणि आसपासच्या बहुतांश भागात पावसाची नोंद करण्यात आली आहे. एक दोन ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पण अनुभवला गेला आहे.

संपूर्ण भारतावर बनलेली विविध हवामान प्रणाली

या गतिविधींचे कारण आहे संपूर्ण भारतावर बनलेली विविध हवामान प्रणाली. सध्या एका नंतर एक पश्चिमी विक्षोभ उत्तर भारताला प्रभावित करत आहे. प्रभावाने एक चक्रवाती परिस्थिती सुद्धा बनलेली आहे. याशिवाय, एक ट्रफ रेषा दिल्ली पर्यंत विस्तारलेली आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, दिल्ली आणि आसपासच्या भागात १७ व १८ मे पर्यंत धुळीचा वादळासह पावसाची शक्यता आहे.

Also read in English: Pre-Monsoon rains in Delhi, Noida, Gurugram and Faridabad to continue till May 17

चालेल्या पावसामुळे आमची अशी अपेक्षा आहे कि येणाऱ्या दिवसात हवामानाची परिस्थिती आरामदायक राहील व दिल्ली, नोएडा, गुरुग्राम आणि गाझियाबाद मध्ये तापमानात लक्षणीय घट दिसून येईल आणि तापमान सामान्यपेक्षा कमी नोंदवले जातील. तसेच, दिल्लीच्या रहिवाशांना येत्या एक आठवड्यात प्रचंड गरमी पासून सुटका मिळेल.

प्रदूषण बदल सांगायचे तर, आता पर्यंत दिल्ली आणि आसपासच्या भागात प्रदूषणाचा स्तर खराब श्रेणी मध्ये बनलेला होता. परंतु, आज झालेल्या पावसामुळे प्रदूषणाच्या स्तरात लक्षणीय सुधारणा दिसून आलेली आहे. दिल्लीच्या बहुतांश भागात प्रदूषण मध्यम श्रेणी मध्ये पोहोचून गेला आहे.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES