मागील ५ व ६ नोव्हेंबर रोजी झालेल्या हलक्या पावसामुळे नागरिकांना उकाड्या पासून काहीशी सुटका निश्चितच मिळालेली होती असे म्हणले पाहिजे. परंतु, निसर्गाने आपला मिजाज बदलला व राज्यातील वातावरण पुन्हा कोरडे झाले.
साधारण ७ नोव्हेंबर पासून, राज्यात कोरडे हवामान असून, मागील २४ तासात मात्र वातावरणात बदल अनुभवण्यात येत आहे. सध्या एक ट्रफ रेषा मध्य-महाराष्ट्रापासून दक्षिण कोकण व गोव्या पर्यंत विस्तारलेली आहे ज्यामुळे दक्षिण मध्य महाराष्ट्रात काही भागांमध्ये हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी अनुभवण्यात आलेल्या आहेत.
पुढील ४८ तास तरी ही ट्रफ रेषा उपस्थित राहण्याची अपेक्षा असल्यामुळे कोंकण-गोव्यासह मध्य-महाराष्ट्रात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता आहे. तसेच, मराठवाड्यात देखील काही तुरळक ठिकाणी हलक्या सरींची शक्यता नाकारता येत नाही.
तसेच पुणे, अहमदनगर, आणि नाशिक येथे देखील एक-दोन हलक्या सरी होवू शकतात. दरम्यान पावसाळी गतीविधी दक्षिण मध्य-महाराष्टात प्रामुख्याने कोल्हापूर, सातारा आणि सांगली येथे होण्याची शक्यता अधिक आहे.
Image Credits – DNA India
Any information taken from here should be credited to Skymet Weather