काल पासून उत्तर प्रदेशच्या पश्चिम आणि मध्य भागात विखुरलेल्या पावसाची नोंद करण्यात येत आहे. आता पण येथे धुळीचे वादळ बनलेले आहे, ज्यामुळे आज पण पावसाची शक्यता आहे.
स्कायमेटच्या अंदाजानुसार येणाऱ्या दोन ते ४ तासात, उत्तर प्रदेशच्या पश्चिम आणि उत्तर पश्चिम भागात पावसाची शक्यता आहे. येथील भाग जसे बाघपत, बिजनोर, मेरठ, मुझफ्फरनगर, शहरांपुर आणि शामली येथे येणाऱ्या दोन ते चार तासात पाऊस अनुभवण्यात येईल.
तथापि, उद्या पासून हवामानाची परिस्थिती बदलेल आणि उत्तर पश्चिम दिशेने कोरडे वारे राज्यात वाहू लागतील. ह्या गरम आणि कोरडे वाऱ्यांमुळे तापमानात देखील वाढ दिसून येईल.
आमीच अशी अपेक्षा आहे कि जम्मू काश्मीरवर बनलेला पश्चिमी विक्षोभ पूर्व दिशेत चालू लागेल. तसेच, बनलेली चक्रवाती परिस्थितीचा प्रभाव देखील कमी होईल, ज्यामुळे उत्तर प्रदेशसह संपूर्ण उत्तर पश्चिम भागांवर हवामान कोरडे होईल.
Also read in English: Rain in Uttar Pradesh likely today, dry weather thereafter
याउलट, राज्यातील पूर्व भाग कोरडे हवामानच अनुभवतील. येथे हवामानात कोणताही बदल नाही दिसून येईल. याशिवाय, येणाऱ्या दिवसात, कोणतीही महत्वपूर्ण हवामान प्रणाली भारतावर विकसित होणार नाही, असे दिसून येत आहे.
कोरड्या हवामानामुळे तापमानात लक्षणीय वाढ दिसून येईल व तापमान ४० अंश किंवा त्याच्या वरती पण पोहोचू शकतो. पावसाळी वादळ जूनच्या पहिल्या आठवड्यात परतण्याची शक्यता आहे, परंतु, फक्त उत्तर प्रदेशचे पश्चिम व उत्तर पश्चिम भाग पाऊस अनुभवतील.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे