संपूर्ण महाराष्ट्रात आतापर्यंत कोरडे हवामान चालू होते. येथे कमाल तापमान सामान्यपेक्षा अधिक नोंदवले गेले तर दुसरीकड़े किमान तापमानात लक्षणीय घट दिसून आली होती. याशिवाय, जम्मू-काश्मीरवार झालेल्या बर्फवृष्टीमुळे, महाराष्ट्रावर वायव्य दिशेने थंड वारे चालू होते ज्यामुळे विदर्भ आणि मराठवाडयातील काही भागांमध्ये पहाटे थंडीचा कडाका जाणवत होता. याशिवाय, विदर्भातील एक दोन ठिकाणी शीतलहर पण अनुभवली गेली.
आज ही नागपुरमधे किमान तापमान 8.1 अंश नोंदले गेले जे 6 अंशानी कमी आहे, तसेच, अकोलामधे 12.5 अंश, अमरावतीमध्ये 13.6 अंश, बुलडाणा 16 अंश, यवतमाळमध्ये 15 अंश नोंदले गेले.
परंतु आता येणाऱ्या दिवसात हवामानाच्या परिस्थितीत बदल अपेक्षित आहे, राज्यावर लवकरच दक्षिण पूर्व दिशेने आर्द्र वारे वाहण्यास सुरूवात होईल. परिणामस्वरूप किमान तापमानात वाढ दिसून येईल। याशिवाय, 24 जानेवारीपर्यंत कोरडे हवामान सुरू राहील पण त्यानंतर दक्षिण पूर्व आणि दक्षिण पश्चिम दिशेने येणाऱ्यावार्यांमुळे, विदर्भ आणि मराठवाडयातील काही ठिकाणी 25 जानेवारीला हलका ते मध्यम पाऊस होण्याचीशक्यता आहे.
गोंदिया, चंद्रपुर, वर्धा, नांदेड़, उस्मानाबाद, जालना, आणि परभणी या जिल्ह्यात पावसाची शक्यता आहे, तसेचएक दोन ठिकाणी गारपीट पण होण्याची शक्यता आहे. याशिवाय मुंबई, डहाणू आणि ठाणे, येथे देखील हलकापाऊस होऊ शकतो.
ही परिस्थिति 27 जानेवारीपर्यंत राहणे अपेक्षित असून, त्यानंतर 28 जानेवारीला हवामान स्वच्छ होईल. दरम्यान, पावसामुळे कमाल तापमानात पण घट दिसून येईल।
Image Credits – Traffic Safety Store
Any information taken from here should be credited to Skymet Weather