Skymet weather

[Marathi] पुढील काही दिवस महाराष्ट्रात चांगला पाऊस, पुणे आणि मुंबईत पाऊस

August 30, 2019 2:37 PM |

Weather in Maharashtra

विदर्भात अलिकडे चांगला पाऊस पडत आहे. तसेच गेल्या २४ तासांत बर्‍याच भागात मध्यम पाऊस झाला आहे. दरम्यान, कोकण आणि गोव्यात पावसाळी गतिविधींमध्ये वाढ झाली असून, हलका ते मध्यम पावसासह काही ठिकाणी मुसळधार पाऊस पडला. मध्य महाराष्ट्रातही हवामान विषयक गतिविधींमध्ये किरकोळ वाढ झाली आहे.

सध्या, चक्रवाती अभिसरण ईशान्य अरबी समुद्रावर मुख्य समुद्र सपाटीपासून ५.४ किमी वर आहे. त्याच्या प्रभावामुळे कोकण आणि गोवा भागात पावसाचा जोर वाढेल. तसेच आगामी दोन ते तीन दिवस मुंबईत मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

त्याप्रमाणेच डहाणू आणि ठाणे येथे पावसाळी गतिविधीत वाढ होईल, तर विदर्भ आणि मराठवाड्यात येत्या २४ ते ४८ तासांत मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.

येत्या २४ ते ४८ तासांत पुण्यात हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता असून, जोरदार सरींची शक्यता नाही.

२ सप्टेंबरपासून मराठवाड्यात पावसाचा जोर कमी होणार आहे परंतु विदर्भाच्या काही भागात कमी अधिक प्रमाणात पावसाचा जोर कायम राहणार आहे.

येत्या ३ ते ५ सप्टेंबर दरम्यान मुंबईत पावसामध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे. तथापि, हा पाऊस पूर येण्याइतका जोरदार नाही परंतु सखल भागात पाणी साचल्याने काही ठिकाणी अडचणी उद्भवू शकतात. एकंदरीत, आम्ही असे म्हणू शकतो की मुंबईत पाऊस परत येईल, ज्यामुळे उष्ण आणि दमट वातावरणापासून मोठा दिलासा मिळेल.

Image Credits – Whatshot

Any information taken from here should be credited to Skymet Weather






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try