सध्या, महाराष्ट्राच्या विदर्भातील भागात उष्णतेची लाट अनुभवण्यात येत आहे. याशिवाय, मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात कमाल तापमान सामान्यपेक्षा अधिक नोंदवले जात आहे. याउलट, कोंकण व गोवातील तापमान सामान्य किंवा सामान्यांच्या जवळ नोंदवले जात आहे. खरं तर, महाराष्ट्रातील हवामान १७ एप्रिल पासूनच कोरडे राहिले आहे.
आमची अशी अपेक्षा आहे कि येणाऱ्या २४ तासात, संपूर्ण राज्यात उत्तर पश्चिम दिशेने कोरडे वारे वाहतील व कमाल तापमान पण सामान्यपेक्षा अधिक नोंदवला जाईल.
स्कायमेटच्या अंदाजानुसार, एक ट्रफ रेषा छत्तीसगड पासून रायलसीमा पर्यंत१२ मे सुमारास विस्तारली जाईल. हि रेषा दक्षिण पूर्व मध्य प्रदेशच्या जवळून जाईल, ज्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही ठिकाणी ११ व १२ मे ला हलक्या ते मध्यम विखुरलेल्या पावसाची शक्यात आहे.
इंग्रेजीत वाचा: Pan India pre Monsoon rainfall performance: March 1, 2019 to May 8, 2019
येणाऱ्या पावसामुळे ११ व १२ मे सुमारास विदर्भातील रहिवाशांना उष्णतेच्या लाट पासून सुटका मिळेल.
या वर्षी, पूर्व मॉन्सून गतिविधींची संपूर्ण महाराष्ट्र राज्यात कमतरता दिसून आली आहे. तसेच, येणारे पूर्व मॉन्सूनचे पाऊस पण फार मोठ्या प्रमाणावर राज्यातील पावसाची कमतरता नाही कमी करू शकणार. बहुंतांश भागात हलका पाऊस पडेल व फक्त एक दोन ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे.
आम्ही असे म्हणू शकतो कि पावसाची कमतरता मुळे महाराष्ट्रात उपजणारे पिकांना पण नुकसान होणे स्वाभाविक आहे. सध्या हे धक्कादायक आहे की महाराष्ट्रातील पाण्याची जलाशयांची क्षमता २० टक्के पेक्षा कमी आहे.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे