Skymet weather

[Marathi] गुजरातमध्ये १४ मे च्या आसपास पाऊस, तापमान आटोक्यात राहणार 

May 7, 2019 3:54 PM |

Gujarat weather

गुजरातसाठी किनारपट्टी जिल्ह्यांशिवाय मे महिना सर्वाधिक गर्मीचा आहे,या काळात राज्यात तापमान ४५ अंश सेल्सिअस पर्यंत जाते. खरं तर, किनारी आणि अंतर्गत जिल्ह्यांच्या तापमानात सुमारे ६ ते ८ अंशाचा फरक असतो.

साधारणपणे,अरबी समुद्रावरील वाऱ्यांच्या प्रभावामुळे पोरबंदर, द्वारका, जुनागड, वेरावळ आणि वलसाड यासारख्या किनारी गुजरात मधील ठिकाणी उष्णता तुलनेने कमी असते.

दरम्यान, उर्वरीत गुजरात राज्यातील राजकोट, अहमदाबाद, अमरेली, भुज, जामनगर, वडोदरा, गांधीनगर, कंडला आणि सुरेंद्रनगर यासारख्या जिल्ह्यांत उत्तर / उत्तरपश्चिमेकडील उष्ण वाऱ्यांमुळे कधी कधी अति तीव्र उष्णता निर्माण होते.

सध्या गुजरातमध्ये सामान्य तापमान नोंदविले जात आहे. किनारी प्रदेशात कमाल तापमान ३५ अंश सेल्सिअस च्या आसपास आहे तर अंतर्गत भागात दिवसाचे कमाल तापमान ४१ अंश सेल्सिअस च्या आसपास आहे. सध्या गुजरात राज्यात उष्णतेची लाट नाही.

आगामी १० दिवसात, गुजरातमध्ये तापमानात फारसा बदल अपेक्षित नाहीत. परंतु दिवसाचे तापमान १ ते २ अंशांनी खाली घसरू शकते.

इंग्रेजीत वाचा: Temperatures in Gujarat to remain under check, pre-Monsoon rains likely around May 14

पुढील २४ तासांनंतर येणाऱ्या पश्चिमी विक्षोभामुळे पश्चिम हिमालय क्षेत्र प्रभावित होणार असल्याचे दिसत आहे ज्यामुळे राजस्थान आणि आसपास च्या परिसरात कमी दाबाचा पट्टा तयार होण्याची शक्यता आहे. या गतिविधींमुळे ९ आणि १० मे च्या आसपास उत्तर भारतातील काही भागांमध्ये वादळी वाऱ्यांसह गडगडाटी पावसाची शक्यता आहे.

या प्रणालीच्या प्रभावामुळे, गुजरात मधून वाहणाऱ्या वाऱ्याची दिशा बदलेल.  वारे उत्तर / उत्तर-पश्चिम ते पश्चिम / दक्षिण-पश्चिम दिशेने दिशा बदलतील. यामुळे तापमान कमी राहण्यास मदत होईल.

याशिवाय, १४ आणि १६ मे दरम्यान, गुजरातच्या काही भागांवर या प्रणालींचाही परिणाम होऊ शकतो. या काळात गुजरातमध्ये धुळीच्या वादळासह गडगडाटी पावसाची शक्यता आहे.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try