सर्वसाधारणपणे मान्सून जेंव्हा भारताच्या मुख्य भूमीवर सक्रीय होतो त्यावेळी पश्चिम किनारपट्टीला म्हणजेच केरळात चांगलाच पाऊस सुरु असतो. आणि मग नंतर कर्नाटक आणि महाराष्ट्रात मान्सूनचा चांगला पाऊस सुरु होतो.
गेल्या महिन्यात केरळात मान्सूनची मोठी लाट १५ जून ते २० जून दरम्यान आली होती आणि त्यामुळे केरळातील इतर भागात भरपूर पावसाची नोंदही झाली. तसेच केरळ लगतच्या कर्नाटकच्या उपभागात आणि कोकण आणि गोव्यातही १७ ते २३ जूनला चांगल्या पावसाची नोंद करण्यात आली होती.
मुंबईत जोरदार पावसाची सुरुवात १५ जूनला झाली तसेच १७ ते २० जून दरम्यान खूप मोठ्या प्रमाणात पावसाची नोंद झालेली आहे.
तसेच कोकण आणि गोव्यात मान्सूनची दुसरी लाट ३० जून ते ३ जुलै या दरम्यान आलेली असून तेंव्हापासून त्याभागात चांगलाच पाऊस होतो आहे.
पश्चिम किनारपट्टीला जोरदार पाऊस होण्यामागे दोन मुख्य कारणे आहेत एक म्हणजे किनारपट्टीजवळ निर्माण झालेल्या हवामान प्रणालीचा प्रभाव आणि दुसरे म्हणजे कर्नाटकच्या किनारपट्टीला अरबी समुद्रात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होणे.
भारतातील स्कायमेट या हवामान संस्थेने दिलेल्या माहितीनुसार २३ जूनला अरबी समुद्रातून जे कमी दाबाचे क्षेत्र गुजरातकडे सरकले त्यानंतर मात्र एकही नवीन हवामान प्रणाली दिसलेली नाही. आणि तसेच हिमालयाच्या पायथ्याशी मान्सूनचा प्रभावी पट्टा सक्रीय झालेला असून त्यामुळे पश्चिमी किनारपट्टीला कमी पाऊस होईल.
तसेच येत्या ४८ तासात मान्सूनची लाट सक्रीय होण्याचे अपेक्षित असून कोकण आणि गोव्याला चांगला पाऊस होण्याची शक्यता आहे. जेव्हा बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे क्षेत्र निर्माण होऊन ते अरबी समुद्राकडून येणाऱ्या हवेमुळे जमिनीच्या दिशेने सरकेल तेंव्हा हि लाट सक्रीय होईल.
Image Credits: www.dailythanthi.com