मान्सूनपूर्व काळात महिन्याच्या सुरुवातीला २ ते ४ जून दरम्यान केरळ आणि किनारपट्टीकडील कर्नाटकात चांगलाच पाऊस झाला आणि त्यामुळेच मान्सूनचे आगमन झाले असे जाहीर करण्यात आले होते. पण मान्सूनच्या आगमनानंतर ५ जून पासून या भागातील पाऊस जवळ जवळ ओसरला कारण अरबी समुद्रात निर्माण झालेले कमी दाबाचे क्षेत्र. या प्रणालीमुळे मुळे मान्सूनचा जोर कमी झाला.
८ जूनला या प्रणालीचे रुपांतर चक्रीवादळात झाले आणि त्यामुळे पश्चिम किनारपट्टीकडील भागात जोरदार नैऋत्य मोसमी वारे वाहण्यास सुरुवात झाली आणि किनारपट्टीकडील भागात म्हणजेच कर्नाटक, कोकण आणि गोवा येथे जोरदार पाऊस सुरु झाला.
गेल्या ३ दिवसात मंगरूळ येथे १८३ मिमी पावसाची नोंद करण्यात आली तसेच होनावर येथेही ८५ मिमी पावसाची नोंद झाली. तसेच गोवा येथे ७६ मिमी पाऊस झाला. मंगळवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत गेल्या २४ तासात कारवार येथे ७९ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.
पण आपल्याला माहितच आहे कि अशोबा हे चक्रीवादळ आता ओमानच्या दिशेने पुढे सरकले असून सोबत पश्चिम किनारपट्टीवरील आर्द्रता आणि हवा घेऊन पुढे गेले आहे. आणि त्यामुळेच पश्चिम किनारपट्टीकडील भागात अजून २ ते ३ दिवस येथे पावसाचा जोर लाक्षणिकरित्या कमी झालेला असेल.
दोन ते तीन दिवसानंतर मान्सूनची क्षमता भरून येऊन १४ जून आणि १५ जून दरम्यान चांगल्याच पावसाची शक्यता आहे.
Image Credit: livemint.com