[Marathi] भारताच्या पश्चिम किनारपट्टीला चांगला पाऊस सुरु, अजूनही पाऊस येण्याची शक्यता

October 6, 2015 2:42 PM | Skymet Weather Team

ऑक्टोबर महिन्याच्या सुरुवातीपासूनच कर्नाटक आणि केरळ सह भारताच्या किनारपट्टीला चांगलाच पाऊस सुरू आहे. फक्त इतकेच नाही तर कोकण आणि गोव्यातही पावसाची उघडझाप चालूच आहे. दक्षिणेकडे सुरु असलेल्या पावसापेक्षा या भागातील पावसाची तीव्रता मात्र कमी आहे.

सोमवारी सकाळी ८.३० वाजेपर्यंत गेल्या २४ तासात मंगरूळ येथे ७१ मिमी आणि कन्नूर येथे ६७ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तसेच कोची येथे ४० मिमी, पुनालूर येथे ३८ मिमी, कोझिकोडे येथे २५ मिमी, अगुंबे येथे २३ मिमी आणि अलाप्पुझ येथे १५ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

कर्नाटकची किनारपट्टी आणि केरळ येथे २६ % पावसाच्या कमतरतेसह दिनांक ३० सप्टेंबरला नैऋत्य मान्सूनची सांगता झाली होती. आणि आता मात्र सुरु असलेल्या पावसामुळे आकडेवारीत मोठ्याप्रमाणात वाढ झालेली दिसून येते आहे. दिनांक ५ ऑक्टोबरला  केरळ येथे ४७ % पावसाची नोंद झाली आहे. तसेच कर्नाटकच्या किनारपट्टीला ४५% पावसाची नोंद झाली आहे.

या आकडेवारीची गणना मात्र नैऋत्य मान्सून च्या नोंदीत करता येणार नाही. पण तरीही या पावसामुळे धरणातील तसेच जमिनीतील पाणी साठा वाढण्यास मदत झाली असून वातावरणातील आर्द्रतेचे प्रमाणही वाढले आहे. या दोन्हीमुळे रब्बी पिकांना भरपूर फायदा होईल.

आणि आता अरबी समुद्रात पूर्व मध्य आणि आग्नेय भागात कमी दाबाचे क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे त्यामुळे या भागातील पावसाची तीव्रता अजून वाढण्याची शक्यता आहे.

Image Credit: thehindu.com

OTHER LATEST STORIES