स्कायमेटने आधीच वर्तविल्याप्रमाणे उत्तर मध्य-महाराष्ट्र तसेच उत्तर कोकण आणि गोवा या दिवसाच्या व रात्रीच्या तापमानात गेल्या २४ तासांत घट झाली आहे.
मुंबई शहरातील किमान तापमान १५.३ अंश सेल्सिअस नोंदले गेले. जळगावातील पारादेखील १५ अंशांवरून १२.४ अंशांवर आला. नाशिकमध्ये देखील पारा दोन अंशांनी घसरला असून आज पहाटेचे तापमान १०.९ अंश नोंदले गेले.
उत्तरेकडील थंड वाऱ्यामुळे थंडी महाराष्ट्रात परतली आहे त्यामुळे तापमानात घट दिसून येत आहे. या उत्तरेकडील थंड वाऱ्यांमुळे नाशिक, पुणे, मुंबई आणि जळगाव येथे तापमान आणखी कमी होण्याची शक्यता आहे. तापमानात १-२ अंशांची घट अपेक्षित आहे. विदर्भातही येत्या २४ तासात तापमानात किरकोळ घसरण होऊ शकते.
येत्या ७ फेब्रुवारीपर्यंत किमान तापमान सामान्यपेक्षा कमी नोंदले जाण्याची शक्यता आहे. त्यानंतर आग्नेय दिशेने वारे वाहू लागतील ज्यामुळे तापमान वाढण्याची शक्यता आहे. हे वारे अंतर्गत महाराष्ट्र व अंतर्गत कर्नाटकमार्गे जात आहेत, जिथे तापमान आधीच जास्त आहे.
दरम्यान, पुढील २४ तासांनंतर विदर्भ आणि छत्तीसगडच्या लगतच्या भागांमध्ये वाऱ्यांचे संगम क्षेत्र तयार होण्याची शक्यता आहे. या प्रणालीमुळे गोंदिया, नागपूर, ब्रम्हपुरी, चंद्रपूर आणि वर्धा येथे ७ आणि ८ फेब्रुवारी रोजी विखुरलेला पाऊस होण्याची शक्यता आहे. राज्यातील उर्वरित भागात हवामान मात्र कोरडेच राहू शकते.
Image Credits – The Live Nagpur
Any information taken from here should be credited to Skymet Weather