येत्या ४८ तासांदरम्यान अवकाळी पावसामुळे विदर्भातील बऱ्याच कालावधी पासून असलेल्या कोरड्या व उबदार हवामानात खंड पडेल. आज सायंकाळपासून हलक्या पावसाला सुरूवात होईल. मेघगर्जना व ढगाळ वातावरणासह, ह्या गतिविधी १३ डिसेंबरपर्यंत सुरू राहण्याची शक्यता आहे.
सक्रिय पश्चिमी विक्षोभाने आता वायव्य राजस्थानात चक्रीय परिभ्रमण प्रेरित केले आहे. या प्रणालीद्वारे, एक कमी दाबाचा पट्टा मध्यप्रदेशातून उत्तर विदर्भापर्यंत विस्तारत आहे. या संयोजनामुळे आज आणि उद्या नागपूर, अकोला, गोंदिया आणि अमरावतीत पावसाची शक्यता आहे.
या प्रणालींचा तापमानावर फारसा परिणाम होणार नसून तरीही ह्या प्रणालीच्या पुढे सरकण्याने अंदाजे १५ डिसेंबरच्या सुमारास किमान तापमानात २ ते ३ अंश सेल्सिअसने घट होईल. दुसरीकडे कोकण आणि गोवा, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात हवामान पूर्णपणे कोरडे राहील.
बंगालच्या उपसागरावरील तीव्र कमी दाबाचा पट्टा, चक्रीवादळ किंवा कमी दाबाचे क्षेत्र यापैकी कोणतीही प्रणाली निर्माण झाल्याने विदर्भात व लगतच्या मराठवाड्यात डिसेंबरमध्ये पाऊस पडतो. सामान्यत: ह्या प्रणाली वायव्य दिशेने आंध्र प्रदेश किनारपट्टीकडे जातात, तर त्यांच्या शेपटाचा प्रभाव विदर्भापर्यंत होतो. तसेच कधीकधी, सक्रिय पश्चिमी विक्षोभ राजस्थानमध्ये चक्रीय परिभ्रमण प्रेरित करते, ज्यातून कमी दाबाचा पट्टा देशाच्या मध्य भागांपर्यंत विस्तारतो. या प्रणालीच्या प्रभावामुळे विदर्भामध्ये हलका पाऊस देखील होवू शकतो.
Image Credits – India.com
Any information taken from here should be credited to Skymet Weather