काल,विदर्भातील काही भागात कमाल तापमान जास्त असल्यामुळे अती उष्णतेची परिस्थिती निर्माण झाली होती . ब्रम्हपुरीत कमाल तापमान ४५ अंश एवढे नोंदविले गेले .महाराष्ट्रामध्ये फक्त उष्णतेचीच परीस्थिती आहे असे नाही तर विदर्भ, मराठवाडा, मध्य आणि उत्तर महाराष्ट्राच्या काही भागांत गडगडाटी वादळासह हलकासा पाऊसपण काल संद्याकाळी झाला .
सोलापुर मध्ये मे महिन्यात ५५मिमी पावसाची नोंद झाली गेल्या दशकातील मे महिन्यातील पावसाची हि सर्वात जास्त झालेली नोंद आहे . सांगलीमध्ये १५ मि.मी. आणि कोल्हापूरमध्ये १२ मिमी सरासरी पावसाची नोंद झाली.
[yuzo_related]
कमी दाबाच्या पट्ट्यामुळे वारे सध्या दक्षिण पूर्व मध्य प्रदेशाकडून विदर्भ आणि मराठवाडा ओलांडून कर्नाटकाकडे वाहत आहेत .त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यात जोरदार वादळ व पाऊस होण्याची शक्यता आहे .
दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण-कोंकण भागांमध्ये काही ठिकाणी पाऊस पडेल. सांगली, सातारा, सोलापूर, पुणे, उस्मानाबाद, अकोला, वेंगुर्ला या शहरांमध्ये गडगडाटी वादळ होण्याची शक्यता आहे .
उत्तर मध्य महाराष्ट्रात तापमान उष्णच राहील जळगाव व मालेगाव येथे कमाल तापमान हे साम्यान तापमानापेक्षा जास्त नोंदविले जाईल .
थोडक्यात उष्णतेची लाट या भागात मुक्काम ठोकून राहील . मुंबईमध्ये हवामान उबदार व दमट राहील असा अंदाज आहे . पाऊस सध्या तरी मुंबई शहरापासून दूर राहील .
Image Credit:
येथूनघेतलेल्याकोणत्याहीमाहितीचेश्रेयskymetweather.com लाद्यावे.