[Marathi] सांगली, सातारा, कोल्हापुरात पाऊस, राज्यात निवडणुकीच्या दिवशी पावसाचा अडसर

October 21, 2019 11:28 AM | Skymet Weather Team

नैऋत्य मॉन्सून महाराष्ट्रासह संपूर्ण देशातून परतला असून आता ईशान्य मान्सूनने देशाच्या दक्षिणेकडील भागांमध्ये हजेरी लावली आहे.

तथापि, असे दिसते आहे की महाराष्ट्र राज्यात अद्याप पावसाळा संपला नाही. कारण सध्या अरबी समुद्रातील कमी दाबाच्या प्रभावामुळे राज्यात पाऊस होत आहे. तसेच गेल्या २४ तासांत देखील सरींची नोंद झाली आहे.

शिवाय, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, आणि उत्तर-कोकण यासह महाराष्ट्रातील बऱ्याच भागांत, येत्या २४ तासांत हलक्या सरी सुरूच राहतील असा अंदाज आहे.

दुसरीकडे मात्र, दक्षिण मध्य-महाराष्ट्र, मराठवाडा, तसेच दक्षिण कोकण आणि गोवा येथे पावसाचा जोर अधिक असेल. आज, महाराष्ट्रात मतदानाच्या दिवशी सांगली, सातारा, कोल्हापूर येथे पावसामुळे काही अडथळे निर्माण होण्याची शक्यता आहे. मुंबईत मात्र पाऊस हलका असेल, त्यामुळे मतदारांना आपला हक्क बजावण्यात कुठलाही अडथळा नाही येणार.

दरम्यान काल सांगलीत संध्याकाळच्या वेळेस मुसळधार पाऊस अनुभवण्यात आला. वास्तविक, मध्यम ते मुसळधार पावसाने दक्षिण मध्य महाराष्ट्रातील बर्‍याच भागात जोरदार हजेरी लावली आहे.

प्रत्यक्षात, मराठवाड्याच्या काही भागासह दक्षिण मध्य महाराष्ट्र, दक्षिण कोकण आणि गोवा येथे एक किंवा दोन तीव्र सरींसह मध्यम पावसाची शक्यता आहे.

या पावसाळी आणि ढगाळ वातावरणामुळे संपूर्ण महाराष्ट्र राज्यात किमान २ दिवस हवामान आल्हाददायक राहण्याची अपेक्षा आहे.

Image Credits – The Hindu Business Line 

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES