गेल्या २४ तासात, राजस्थान मधील बऱ्याच भागात धुळीचा वादळासह गडगडाटी पावसाची नोंद करण्यात आली आहे. जैसलमेर, जोधपूर, उदयपूर, बारमेर व राज्यातील उत्तर भाग जसे हनुमानगढ, गंगानगर आणि चुरु, येथे पावसाची नोंद करण्यात आली आहे.
पूर्व मॉन्सूनच्या गतिविधींचा कारण आहे गेल्या दोन दिवसां पासून राजस्थानच्या पश्चिम भागांवर बनलेली एक चक्रवाती परिस्थिती. आमची अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या दोन दिवसात पूर्व मॉन्सूनच्या जोर राजस्थावर वाढेल, ज्यामुळे येथे बऱ्याच ठिकाणी जोरदार पावसाची नोंद करण्यात येईल. स्कायमेटच्या अंदाजानुसार राजस्थान मध्ये पूर्व मॉन्सूनच्या पाऊस १५ मे पर्यंत अनुभवला जाईल.
उष्णतेच्या लाट पासून सुटका
पूर्व मॉन्सूनच्या गतिविधींच्या परिणामस्वरूप, आधीच येथील तापमान घट दिसून आलेली आहे. सध्या, राजस्थानचे बहुतांश भाग जे आता पर्येंत उष्णतेची लाट अनुभवत होते, त्यांचे कमाल तापमान ४० अंशचा खाली पोहोचले आहे. याउलट, एक दोन ठिकाण उष्णेतची लाट अनुभवत आहे, परंतु, आमची अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या दिवसात तापमानात अजून घट दिसून येईल, ज्यामुळे राजस्थान मध्ये हवामान आरामदायक होईल.
Also read in English: More rain and thundershower in bags for Rajasthan, relief from heat wave
राजस्थानचे भाग जसे, जैसलमेर, जोधपूर, उदयपूर, बारमेर व राज्यातील उत्तर भाग जसे हनुमानगढ, गंगानगर आणि चुरु, येथे पावसाची तीव्रता वाढेल.
पूर्व मॉन्सूनच्या गतिविधी बाहुतांश दुपारी किंवा संध्याकाळी घडतील, ज्यामुळे संध्याकाळी, सकाळी आणि रात्री हवामान आनंददायी होईल. या भागांना उष्णतेच्या लाट पासून पण सुटका मिळेल व या भागांच्या कमाल तापमानात लक्षणीय घट दिसून येईल.
याशिवाय, एक दोन ठिकाणी मेघगर्जनेची पण शक्यता आहे.
प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया
येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे