[Marathi] पुणे, नाशिक आणि नागपूर मध्ये पुढील २४ तासांच्या दरम्यान पाऊस तर मुंबईत निकृष्ट हवेसह हवामान कोरडे राहणार

December 15, 2019 2:59 PM | Skymet Weather Team

गेल्या २४ तासात विदर्भात गडगडाटासह हलक्या पावसाची नोंद झाली असून उर्वरित हवामान विभाग मात्र पूर्णपणे कोरडे राहिले. मध्य महाराष्ट्र आणि कोकण भागातील दक्षिणेकडील भागात हवामान उबदार होते.

सध्या विदर्भात वातावरणातील वरच्या थरात कमी दाबाचा पट्टा विस्तारत आहे. ही प्रणाली पुढे ओडिशा आणि दक्षिण मध्य महाराष्ट्रातून विस्तारली जाईल. यामुळे विदर्भ, मराठवाडा आणि उत्तर मध्य महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणची हवा एकत्र येत आहे.

पुढील २४ ते ३६ तासांत या तीन हवामान विभागांत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. पुणे, औरंगाबाद, नाशिक, अकोला, अमरावती, नागपूर, यवतमाळ, जालना येथे देखील पावसाची अपेक्षा आहे. दुसरीकडे महाराष्ट्राच्या उर्वरित भागातील हवामान पूर्णपणे कोरडे राहील.

उत्तर कोकणात तापमानात किंचित घट होईल. दरम्यान, मुंबईतील हवामान ‘मध्यम ते निकृष्ट’ प्रदूषणाच्या पातळीसह कोरडे राहण्याची शक्यता आहे. आकाश अंशतः ढगाळ असेल आणि तापमानात घट झाल्यामुळे रात्रीचे वातावरण आल्हाददायक होईल.

हा पाऊस संत्री आणि भुईमूग या पिकांसाठी फायद्याचा ठरेल.

Image Credits – Newsmobile 

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES