[Marathi] नांदेड, चंद्रपूर, अकोला, अमरावती, परभणी येथे हलका पाऊस

February 3, 2020 4:02 PM | Skymet Weather Team

गेल्या बर्‍याच दिवसांपासून महाराष्ट्रामध्ये कोणतीही हवामानविषयक लक्षणीय गतिविधी अनुभवलेली नाही. तथापि, गेल्या २४ तासांत विदर्भ आणि लगतच्या महाराष्ट्रातील काही भागात तुरळक हलका सरी नोंदल्या गेल्या आहेत. विदर्भ ते ओडिशा दरम्यान तयार झालेले विभिन्न दिशेने येणाऱ्या वाऱ्यांचे संगम क्षेत्र हे या पावसामागील प्रमुख कारण आहे ज्यामुळे या भागावर नैऋत्य दिशेने येणारे आर्द्र वारे वायव्य दिशेने येणाऱ्या थंड व कोरड्या वाऱ्यांसोबत विलीन होत आहेत.

हे संगम क्षेत्र महाराष्ट्राच्या पूर्व भागावर म्हणजेच विदर्भावर कायम राहील. त्यामुळे विदर्भात ५ किंवा ६ फेब्रुवारीपर्यंत हलका पाऊस पडेल असा अंदाज आहे. दरम्यान, बंगालच्या उपसागरातून उबदार व दमट आग्नेय वाऱ्यांचा प्रवाह सुरू राहिल्यामुळे विदर्भ व मराठवाड्यातील किमान तापमान सामान्यपेक्षा थोडे अधिक राहील. दुसरीकडे कोकण आणि गोव्याबरोबरच मध्य महाराष्ट्रातील हवामानही कोरडेच आहे. महाराष्ट्राच्या किनारपट्टीलगत चक्रवाती परिभ्रमण निर्माण झाल्यामुळे सध्या मध्य महाराष्ट्र, कोकण आणि गोवा येथे आग्नेय दिशेने वारे वाहत आहेत.

या उष्ण वाऱ्यांमुळे या भागात दिवसाच्या आणि रात्रीच्या तापमानात दोन ते चार अंशांची वाढ झाली आहे. गेल्या काही दिवसांपासून थंडीच्या वातावरणाचा अनुभव घेत असलेल्या मुंबई, पुणे आणि नाशिकसारख्या ठिकाणी आता तापमानात वाढ दिसून येत आहे.

उत्तर कोकण आणि गोवा तसेच उत्तर मध्य महाराष्ट्रात ६ फेब्रुवा

Image Credits – Business Line

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES