[Marathi] कमी दाबाच्या पट्ट्यामुळे पुणे, मुंबई, औरंगाबाद आणि वेंगुर्ल्यात पाऊस

October 24, 2019 1:59 PM | Skymet Weather Team

कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव राज्यावर दिसून येत असून गेल्या २४ तासात राज्यात पावसाळी गतिविधी तीव्र झाल्याचे स्पष्टपणे दिसून येत आहे.

मध्य महाराष्ट्रातील काही भागात मध्यम ते मुसळधार पावसाने हजेरी लावली असून दक्षिण कोकण आणि गोव्यात देखील मुसळधार ते अति मुसळधार पाऊस झाला आहे.

स्कायमेटकडील पावसाच्या आकडेवारीनुसार वेंगुर्ला येथे चोवीस तासांच्या कालावधीत ७० मिमी, अहमदनगरमध्ये ४४ मिमी आणि सांगलीत ३३ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

दुसरीकडे, मुंबई आणि उत्तर कोकण आणि गोव्याच्या काही भागात विखुरलेला हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस अनुभवण्यात आला असून विदर्भ मात्र कोरडाच राहिला आहे.

आमच्या हवामानशास्त्रज्ञांच्या अनुसार, कमी दाबाच्या क्षेत्राचा प्रभाव कायम राहणार असून आणखी २४ तास तरी कोकण, गोवा, मराठवाडा आणि विदर्भाच्या काही भागात एक किंवा दोन जोरदार सरींसह मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे.

रत्नागिरी, हर्णे, अलिबाग, वेंगुर्ला, महाबळेश्वर, सोलापूर, परभणी, औरंगाबाद, सांगली, सातारा, कोल्हापूर आणि पुणे या जिल्ह्यांत पाऊस पडण्याची शक्यता आहे. दरम्यान, मुंबई एक दोन चांगल्या सरींसह विखुरलेल्या मध्यम स्वरूपाच्या पावसाची शक्यता आहे.

उद्यापासून मात्र कोकण व गोवा येथून कमी दाबाच्या पट्ट्याचा प्रभाव कमी होण्यास सुरवात होईल परिणामी चोवीस तासांनंतर कोकण आणि गोव्यातील पावसाळी गतिविधी कमी होण्याची अपेक्षा आहे. तथापि, दक्षिणेकडील जिल्ह्यांतील विखुरलेल्या स्वरूपाचा हलका ते मध्यम पाऊस कायम राहील. मध्य-महाराष्ट्र तसेच मराठवाड्यातही अशीच परिस्थिती दिसून येईल.

कमी दाबाचा पट्टा वायव्येकडे वळत असताना, २५ ऑक्टोबरच्या संध्याकाळपर्यंत तीव्र कमी दाबाच्या पट्ट्यात रूपांतरित होईल.

Image Credits – The Indan Express 

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES