[Marathi] चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, सांगली आणि सोलापूर येथे येत्या २४ ते ४८ तासांत हलक्या पावसाची शक्यता

February 9, 2020 2:16 PM | Skymet Weather Team

विदर्भात गेल्या चोवीस तासात गडगडाटासह हलका पाऊस पडला. ढगाळ परिस्थिती आणि त्यानंतरच्या पावसामुळे राज्यातील दिवसाच्या तापमानात लक्षणीय घट झाली आहे. दुसरीकडे कोकण आणि गोवा, मराठवाडा तसेच मध्य महाराष्ट्र थोड्या उबदार वातावरणासह कोरडेच राहिले.

स्कायमेटनुसार, चक्रवाती परिभ्रमण मराठवाडा आणि लगतच्या भागावर आहे. या प्रणालीच्या पार्श्वभूमीवर, मराठवाडा आणि लगतच्या दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या आसपासच्या भागात पुढील ४८ तासांत हलक्या सरी आणि गडगडाटी परिस्थिती अनुभवली जाण्याची शक्यता आहे.

दरम्यान विभिन्न दिशेने येणाऱ्या वाऱ्यांचा संगम होत असल्या कारणाने विदर्भातील दक्षिणेकडील भागातही पुढील १२ ते १८ तासांत हलका पाऊस पडण्याची शक्यता आहे. प्रामुख्याने चंद्रपूर, यवतमाळ, नांदेड, लातूर, बीड, सांगली, सोलापूर इत्यादी ठिकाणी हलका पाऊस होण्याची अपेक्षा आहे.

याउलट, मध्य महाराष्ट्रातील उर्वरित भाग आणि उर्वरित उत्तर महाराष्ट्रात हवामान कोरडेच असेल. दिवसा आणि रात्रीच्या तापमानात पुढील तीन ते चार दिवस वाढ होण्याची शक्यता आहे.

मुंबईत उबदार दिवस व सुखद रात्रीसह हवामान कोरडे राहील. हवेची गुणवत्ता ‘मध्यम व खराब’ वर्गात राहण्याची शक्यता आहे. दिवसाचे तापमान ३१ ते ३२ अंश सेल्सिअसच्या दरम्यान स्थिरावण्याची शक्यता असून तर किमान तापमान २० अंशांपेक्षा जास्त राहील.

दिवसा स्वच्छ सूर्यप्रकाशासह पुणे शहरात हवामान कोरडे राहील. कमाल तापमान २९ अंशांच्या आसपास तर किमान १६ अंशांच्या जवळपास राहण्याची शक्यता आहे.

 Image Credits – The Indian Express

Any information taken from here should be credited to Skymet Weather

OTHER LATEST STORIES