[Marathi] सक्रिय मॉन्सूनमुळे कोकणांत पावसाचे आधिक्य तर विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये हलक्या सरी

July 5, 2019 3:15 PM | Skymet Weather Team

स्कायमेटने दिलेल्या अंदाजानुसार, महाराष्ट्राच्या अंतर्गत भागात पावसाचे प्रमाण वाढले आहे. गेल्या २४ तासांत, विदर्भ आणि मध्य महाराष्ट्राच्या काही भागांत हलका ते मध्यम स्वरूपाचा विखुरलेला पाऊस पडला आहे. तसेच,महाराष्ट्रातील कोकण आणि गोवा भागात गडगडाटासह जोरदार पाऊस पडला आहे.

स्कायमेटकडे उपलब्ध माहितीनुसार,गेल्या २४ तासांत, महाबळेश्वरमध्ये ७९ मिमी पावसाची नोंद झाली आहे, तसेच हर्णे मध्ये ५९ मिमी, वेंगुर्लामध्ये ४१ मिमी, माथेरानमध्ये २८ मिमी, ब्रम्हपुरीत २३ मिमी आणि साताऱ्यामध्ये १४ मिमी पावसाची नोंद झाली आहे.

सध्या, दक्षिण गुजरातमध्ये एक चक्रवाती प्रणाली उपस्थित आहे आणि अरबी समुद्रावरून सतत बाष्पयुक्त वारे वाहत आहे. त्यामुळे पुढील २४ तासांत कोकण आणि गोवातील काही भागांत एक ते दोन जोरदार सरींसह मध्यम पावसाची शक्यता आहे.

शिवाय, दक्षिण छत्तीसगड मध्ये अजून एक चक्रवाती प्रणाली तपांबरात वरच्या भागात आहे. या प्रणालीमुळे पुढील २४ तासांत विदर्भ क्षेत्रात मध्यम ते जोरदार स्वरूपाच्या काही सरींची शक्यता आहे. त्यानंतर, विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रामध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा थोडा पाऊस पडेल.

दरम्यान, मुंबईसह उत्तर कोकण आणि गोवा क्षेत्रांत पुढील तीन ते चार दिवसांत चांगला पाऊस पडेल.

चालू असलेल्या पावसामुळे कोकण आणि गोवा क्षेत्रामध्ये पावसाचा अधिशेष ४% ने वाढला आहे. या पावसामुळे मध्य महाराष्ट्राला सामान्य पावसाची कमतरता श्रेणीत आणले गेले आहे (या प्रदेशात केवळ १३% कमी आहे). या उलट,पाऊस पडून सुद्धा विदर्भ आणि मराठवाडा मध्ये पावसाची मोठी कमतरता आहे.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES