[Marathi] मुझफ्फरनगर, बुलंदशहर, भागलपूर आणि अररिया मध्ये आज पण पावसाची शक्यता

May 16, 2019 10:18 AM | Skymet Weather Team

उत्तर प्रदेशच्या पश्चिम भागात, मुख्यतः मुझफ्फरनगर आणि बुलंदशहर, येथे गेल्या काही दिवसांपासून विखुरलेल्या पावसाची नोंद करण्यात येत आहे. याउलट, पूर्वेकडील भाग मात्र कोरडेच राहिलेले आहे.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, होणाऱ्या पावसाचे मुख्य कारण आहे, भारतावर बनलेली विविध हवामान प्रणाली. सध्या, एक चक्रवाती परिस्थिती राजस्थानच्या उत्तर भागांवर बनलेली आहे. याशिवाय, एका नंतर एक पश्चिमी विक्षोभ उत्तर भारताला प्रभावित करत आहे. याशिवाय, उष्ण वारे पण राज्यात वाहत आहे.

बिहार राज्य बदल सांगायचे तर, राज्यातील पूर्व भाग जसे अरारिया, पूर्णिया, सुपौल, किशनगंज, भागलपूर आणि कटिहार, येथे पण गेल्या दोन ते तीन दिवसांपासून मेघगर्जनेसह विखुरलेल्या पावसाची नोंद करण्यात आली आहे.

होणाऱ्या पावसाचे येथे कारण आहे, पश्चिमी विक्षोभ जो सध्या पूर्व दिशेत पुढे जात आहे. याशिवाय, आधी बनलेल्या पश्चिमी विक्षोभामुळे उष्णता राज्यात वाढलेली आहे. एक चक्रवाती परिस्थिती देखील असमच्या पूर्व भागात बनलेली आहे. बंगालच्या खाडीतून उष्ण वारे पण राज्यात वाहत आहे.

Also read in English: More pre Monsoon showers in store for Muzaffarnagar, Bulandshahr, Bhagalpur and Araria

आमची अशी अपेक्षा आहे की, कारण उपस्थित हवामान प्रणाली थोड्या दिवस अजून बनलेली राहील, येणाऱ्या २४ ते ४८ तासात, बिहारच्या पूर्व भागात व उत्तर प्रदेशच्या पश्चिमी भागात पावसाची स्थिती बनलेली राहील.

परंतु, ४८ तासात नंतर, कारण पश्चिमी विक्षोभाचा प्रभाव कमी होईल, हवामान कोरडे होणे सुरु होईल. त्यानंतर, तापमानात पुन्हा एकदा लक्षणीय वाढ दिसून येईल व पार ४० अंशाचा वर पण जाऊ शकतो.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES