Skymet weather

[Marathi] मुंबईतील नागपूर, अकोला येथील हवामान कोरडे तर ; सांगली, सातारा, वेंगुर्ला येथे पाऊस पडण्याची शक्यता

May 25, 2018 5:10 PM |

Pune 1

उष्णतेची लाट अजुनही विदर्भाची पाठ सोडत नाही असे दिसत आहे ,कारण तेथे कमाल तापमान ४५ अंशापेक्षा जास्त नोंदविले गेले आहे. तथापि, दक्षिण कोकण व दक्षिण मध्य महाराष्ट्र विभागात तापमान कमी झाले आहे याचे महत्वाचे कारण म्हणजे येथे झालेला थोडासा पाऊस . गुरुवारी वर्धा मधे सर्वात जास्ती कमाल तापमानाची म्हणजेच ४६अंश एवढी नोंद झाली आहे . तसेच चंद्रपूर येथे ४५. ७ अंश , ब्रम्हपुरी ४५. २, परभणी ४४. ८, अमरावती ४४. ८, नागपूर ४४. ७ अंश ,यवतमाळ ४४. ५ अंश एवढी कमाल तापमानाची नोंद झाली आहे.

दरम्यान, त्याच दिवशी, हर्णै येथील कमाल तापमान ३३. २ अंश ,मुंबई ३४. ७ अंश ,पुणे ३५. ७ अंश , नाशिक ३६. ३ अंश ,महाबळेश्वर येथे मात्र तापमान घसरण होऊन २४. ६ अंश एवढे कमाल तापमान होते.

[yuzo_related]

गुरुवारी सकाळी ८. ३० पासुन २४ तासात चंद्रपूर येथे ३ मि.मी. पावसाची नोंद झाली. त्यापाठोपाठ सातारा ०. ९ मिमी ,कोल्हापूर ०. ४ मिमी ,सांगली ०. ५ मिमी तर वेंगुर्ला येथे सुध्दा तुरळक पावसाची नोंद झाली . उष्णतेची लाट अजुनही मराठवाडा व विदर्भातील अनेक भागांत तळ ठोकुन आहेत . उत्तर मध्य महाराष्ट्रात एक किंवा दोन ठिकाणी अशीच परिस्थिती आहे . तसेच दक्षिण मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण मध्ये हलकासा पाऊस होण्याची शक्यता आहे . बाकी ठिकाणी हवामान कोरडे व ढगाळ राहील.

हवामानाचा महाराष्ट्र कृषी पट्ट्यावर होणारा परीणाम पाहु:

उष्णतेची लाट लक्षात घेता शेतकरी बंधूंनी उन्हाळी पिके / भाज्या यांची काढणी करावी. लिंबवर्गीय फळांना सिंचन द्यावे व मल्चिंग करावे त्यामुळे उष्णतेचा ताण कमी होईल . खरीप हंगामात लागणारे बियाणे व अवजारांची पाहणी करून ठेवावी. कोकणातील शेतकरी बंधूनी नारळ व सुपारी ह्या फळपिकांना दर ५ ते ६ दिवसांनी पानी द्यावे.

Image Credit: tripadvisor 

येथूनघेतलेल्याकोणत्याहीमाहितीचेश्रेयskymetweather.com लाद्यावे.

           

 

 






For accurate weather forecast and updates, download Skymet Weather (Android App | iOS App) App.

Other Latest Stories







latest news

Skymet weather

Download the Skymet App

Our app is available for download so give it a try