[Marathi] राजस्थानममध्ये पूर्व मॉन्सून पाऊस आज विश्रांती घेणार, २० मे रोजी पुन्हा सुरुवात होणार

May 17, 2019 4:53 PM | Skymet Weather Team

मागील बऱ्याच दिवसांपासून राजस्थान राज्यामध्ये पूर्व मॉन्सून गतिविधी चालू आहे. गेल्या २४ तासांमध्ये बारमेर, चुरु, फलोदी, जैसलमेर, जोधपूर, अजमेर, जयपूर, पिलानी, बुंदी, कोटा, भिलवाडा या शहरांमध्ये विजांसह गडगडाटी पाऊस झाला आहे.

तथापि, गुजरातच्या जवळ असलेले दक्षिणेकडील जिल्हे मात्र कोरडे राहिले आहेत.

गुरुवारी सकाळी ८. ३० वाजल्यापासून २४ तासांच्या कालावधीत बारमेर मध्ये १९ मिमी , चुरु मध्ये १५ मिमी, फलोदी मध्ये १३ मिमी, बुंदी मध्ये ९ मिमी, जैसलमेर मध्ये ५ मिमी, कोटा मध्ये ३ मिमी आणि जोधपूर मध्ये २ मिमी पावसाची नोंद करण्यात आली.

हलक्या पावसाच्या सरी आज अपेक्षित असून उद्या पासून मात्र संपूर्ण राजस्थान मध्ये हवामान कोरडे राहील. दरम्यान एक दोन ठिकाणी पूर्व मॉन्सून गतिविधी अनुभवल्या जातील.

पश्चिमी विक्षोभाच्या प्रभावामुळे २० आणि २१ मे रोजी पावसाच्या सरींची शक्यता आहे. ह्या हवामान प्रणालीच्या प्रभावामुळे एक चक्रवाती परिस्थिती पश्चिम राजस्थान वर तयार होण्याची अपेक्षा आहे.

Also read in English: Pre Monsoon rain in Rajasthan to cease after today, begin again around May 20

वर नमूद केलेल्या दिवसांमध्ये पावसाच्या गतिविधी दिसून हवामान पुन्हा कोरडे होईल. त्यानंतर, पूर्व मान्सून पाऊस, धूळी चे वादळ आणि गडगडाटी पाऊस अशी कोणतीही परिस्थिती राजस्थान मध्ये उद्भवण्याची शक्यता नाही.

पुढील तीन ते चार दिवस हवामान कोरडेच राहणार असून तापमान सामान्य राहील. मात्र , २१ मे नंतर पावसाच्या अभावामुळे तापमानात वाढ होण्याची शक्यता असून पुन्हा उष्णतेची लाट येऊ शकते.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES