[Marathi] पंजाब आणि हरियाणा मध्ये पाऊस, उष्णतेच्या लाट पासून मिळेल सुटका

May 14, 2019 4:12 PM | Skymet Weather Team

पूर्व मॉन्सूनच्या हंगामात, हरियाणा मध्ये १७ टक्के कमी पाऊस पडलेला आहे. पंजाब मध्ये २० टक्के पावसाची कमतरता नोंदवण्यात आलेली आहे. मार्च महिन्यात दोन्ही राज्यात हवामान पूर्ण पणे कोरडे राहिले. दुसरीकडे, एप्रिल १५ ते १७ च्या मध्ये काही ठिकाणी पावसाची नोंद करण्यात आलेली आहे.

गेल्या काही दिवसांपासून, पंजाब आणि हरियाणा मधील एक दोन ठिकाणी पूर्व मॉन्सूनचा पाऊस सुरु आहे. मागील २४ तासात, पंजाब आणि हरियाणा मधील बऱ्याच भागात चांगल्या पावसाची नोंद करण्यात आली आहे. याशिवाय, एक दोन ठिकाणी धुळीचे वादळ पण अनुभवले गेले आहे. काल अमृतसर, लुधियाना, पतियाला, अंबाला, रोहतक, हिसार, फरिदाबाद आणि नारनौल मध्ये पूर्व मॉन्सूनचा पाऊस अनुभवला गेला.

Also read in English: Intermittent pre-Monsoon showers to continue in Punjab and Haryana, heat wave to abate

होणाऱ्या पावसाचे कारण आहे एक चक्रवाती परिस्थिती जी सध्या पंजाब आणि हरियाणाच्या पश्चिम भागांवर बनलेली आहे. सध्याची स्थिती पाहता असा दिसून येत आहे की येणाऱ्या २४ तासात, पंजाब आणि हरियाणा मधील एक दोन ठिकाणी धुळीचा वादळासह पावसाची शक्यता आहे. १५ मे च्या रात्रीपासून, एक दुसरा पश्चिमी विक्षोभ जम्मू काश्मीर जवळ पोहोचेल, ज्यामुळे दोन्ही राज्यांवर पावसाचा जोर आणखीन वाढेल.

स्कायमेटच्या अंदाजानुसार, होणाऱ्या पावसामुळे तापमानात लक्षणीय घट दिसून येईल व दोन्ही राज्य कमाल तापमान सामानाच्या जवळ नोंदवतील. आपची अशी अपेक्षा आहे की येणाऱ्या दिवसात, दोन्ही राज्यांना उष्णतेच्या लाट पासून सुटका मिळेल. अशीच स्थिती येणाऱ्या एक आठवड्या करता बनलेली राहील. त्यानंतर हवामान पुन्हा एकदा बदलेल.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES