[Marathi] पंजाब मध्ये आज आणि उद्या जोरदार पावसाची शक्यता, हरियाणा मध्ये विखुरलेला पाऊस

May 24, 2019 10:08 AM | Skymet Weather Team

गेल्या २४ तासात, पंजाब आणि हरियाणा मध्ये विखुरलेल्या पावसाची नोंद करण्यात आलेली आहे. होणाऱ्या पावसाचे कारण आहे एक चक्रवाती परिस्थिती, जी सध्या पाकिस्तानच्या मध्य भाग व लगतच्या पंजाब मध्ये बनलेली आहे. याशिवाय, एक पश्चिमी विक्षोभ पश्चिम हिमालयावर बनलेला आहे.

बनलेल्या हवामान प्रणालीमुळे, पंजाब आणि हरियाणा मध्ये बऱ्याच ठिकाणी आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे.

पंजाबचे भाग जसे पटियाला, लुधियाना, मोगा आणि अमृतसर, येथे आज जोरदार पावसाची शक्यता आहे. उरलेल्या भागांवर विखरूरलेल्या पावसाची अपेक्षा आहे.

Also read in English: Punjab on heavy rain alert during next 48 hours, scattered showers likely in Haryana

याउलट, हरियाणा मध्ये एक दोन ठिकाणी आज आणि उद्या पावसाची शक्यता आहे. हरियाणाचे भाग जसे करनाल, कुरुक्षेत्र आणि हिसार येथे आज आणि उद्या पाऊस पडू शकतो, असे दिसून येत आहे.

होणाऱ्या पावसामुळे, दोन्ही राज्यातील कमाल तापमानात घट दिसून येईल व येणाऱ्या दोन ते तीन दिवसात येथे तापमान सामान्यच्या खाली नोंदवले जातील.

२६ मे रोजी, कारण, पश्चिमी विक्षोभ पूर्व दिशेत पुढे जाईल, त्याच्या प्रभावाने बनलेली चक्रवाती परिस्थितीचा प्रभाव सुद्धा कमी होईल, ज्यामुळे, दोन्ही राज्यांचे हवामान पुन्हा एकदा कोरडे होईल.

हवामान कोरडे झाल्यावर, हवामानची परिस्थिती बदलेल आणि पुन्हा एकदा उत्तर पश्चिम दिशेने गरम आणि कोरडे वारे वाहू लागतील, ज्यामुळे तापमानात लक्षणीय वाढ दिसून येईल. तापमान पण सामान्यच्या जवळ किंवा त्याच्या वर नोंदवले जातील.

खरं तर, हरियाणा मध्ये एक दोन ठिकाणी उष्णतेची लाट २७ मे रोजी देखील अनुभण्यात येईल.

प्रतिमा क्रेडीट: विकिपीडिया

येथून घेतलेली कोणतीही माहितीचा क्रेडिट skymetweather.com ला द्यावे

OTHER LATEST STORIES