[Marathi] पुण्यात पावसाचा जोर कमी होणार, साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यास मदत

August 6, 2019 3:47 PM | Skymet Weather Team

गेल्या २४ तासांत पुणे शहरात २२ मिमी पावसाची नोंद झाली असून चिखली, वाकड, सांगवी, औंध, दत्तवाडी, एरंडवणे, मंगळवार पेठ, कसबा पेठ, आणि सोमवार पेठ अशा अनेक भागात पाणी साचल्याने गोंधळ माजला आहे. खरं तर, गेल्या दोन ते तीन दिवसांपासून पुण्यासह मध्य महाराष्ट्रातील बर्‍याच भागात जोरदार पाऊस चालूच आहे.

पवना धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे मुळा, मुठा आणि पवना नद्यांच्या आसपासच्या अनेक सखल भागात पूरसदृश्य परिस्थिती झाल्याने सुमारे ४००० लोकांना सुरक्षित ठिकाणी हलविण्यात आले आहे.

आमच्या हवामानतज्ञांनुसार, शहरात आजही थांबून थांबून पाऊस चालू राहील. तथापि, पावसाची तीव्रता कमी होण्याची शक्यता असल्याने परिस्थिती सुधारेल. यामुळे साचलेल्या पाण्याचा निचरा होण्यास मदत होईल. आता, पश्चिम किनारपट्टीवरील मान्सूनची लाट कमकुवत होणार असल्याने उत्तर कोकण आणि गोवा तसेच पुण्यासह उत्तर मध्य-महाराष्ट्रात पावसाळी गतिविधी कमी होतील. तथापि, पुढील दोन ते तीन दिवस शहर व आसपासच्या भागात थोड्या थोड्या कालावधीत पावसाची शक्यता नाकारता येत नाही.

दरम्यान १० ऑगस्टनंतर पावसाळी गतिविधीत लक्षणीय घट अपेक्षित आहे ज्यामुळे शहरात पुन्हा कोरडे हवामान होईल.

OTHER LATEST STORIES